Solapur Crime sakal
सोलापूर

Solapur Crime : मोहोळमध्ये सत्तर वर्षीय आजीने घेतला गळफास, तर...

या बाबत परिसरात चौकशी केली असता त्याला कोणीही ओळखत नसल्याचे सांगितले.

राजकुमार शहा

Solapur Crime - मोहोळ तालुक्यातील वेगवेगळ्या दोन घटनात दोघांचा मृत्यू झाला. पहिली घटना सोमराय नगर (मोहोळ) येथील तर दुसरी घटना पोखरापूर येथे घडली. दोन्ही घटनांची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.

प्रकाश रामचंद्र काकडे यांची सोमराय नगर येथे शेती आहे. त्यांच्या जमीन गट नंबर 777/1(अ) मध्ये केळीची बाग आहे. रविवार ता 25 रोजी सकाळी पावणे बारा वाजता काकडे घरी असताना त्यांच्या शेतातील काम करणारा मजूर शरीफ मैनोद्दीन मरपाली वय 42 याने प्रकाश काकडे यांना फोन करून सांगितले की, केळीच्या बागेत एक अनोळखी इसम मृत अवस्थेत पडलेला आहे, त्याची दुर्गंधी सुटली आहे.

प्रकाश काकडे यांनी तातडीने बागेत जाऊन पाहिले असता, एक पुरुष जातीचा 30 ते 40 वर्ष वयाचा अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आला. त्याने अंगात पिवळा शर्ट व निळसर रंगाची पॅन्ट, पायात निळ्या रंगाचा बूट घातलेला आहे. त्याच्या संपूर्ण शरीराला व चेहऱ्याला आळ्या लागून त्याचा मृतदेह कुजला असल्याचे दिसून आले.

सदरचा मृत इसम कोणाच्या परिचयाचा आहे का या बाबत परिसरात चौकशी केली असता त्याला कोणीही ओळखत नसल्याचे सांगितले. याबाबत प्रकाश काकडे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.दुसरी घटना पोखरापूर ता मोहोळ येथे घडली. आकाश विठ्ठल भोसले रा पोखरापूर हे रात्री एक वाजता विहिरी वरील विद्युत पंप चालू करण्यासाठी उठले होते.

त्यावेळी त्यांनी घाबरून घरातील सर्वांना मोठ्याने आवाज दिला व घराबाहेर गेल्यास सांगितले. घरातील आई व दोन बहिणी यांनी बाहेर येऊन पाहिले असता आकाश भोसले यांची आज्जी जनाबाई संतराम भोसले वय 70 हीने दोन झाडांच्या मध्ये असलेल्या केबलला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनाला आले. या बाबत आकाश भोसले यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात जनता वसाहतीत कोयत्याने गाड्यांची तोडफोड; परिसरात दहशतीचे वातावरण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT