corona 
सोलापूर

व्वा...सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी 778 जण कोरोनामुक्त 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीतील 71 आणि ग्रामीण भागात तब्बल 707 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील 778 जण एकाच दिवशी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील 6 हजार 814 तर ग्रामीण भागातील 16 हजार 846 अशा 23 हजार 660 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. 
शुक्रवारी रात्री 12 वाजे पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानूसार ग्रामीण भागात 316 तर महापालिका हद्दीत 66 असे एकूण 382 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 31 हजार 812 झाली असून त्यामध्ये ग्रामीण भागातील 23 हजार 561 तर महापालिका हद्दीतील 8 हजार 251 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालानूसार कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 12 तर महापालिका हद्दीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील 1 हजार 112 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 645 तर महापालिका हद्दीतील 467 जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 109 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. रुग्णालयात सध्या 7 हजार 40 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 6 हजार 70 तर महापालिका हद्दीतील 970 रुग्णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

SCROLL FOR NEXT