Theft-crime 
सोलापूर

कटारे खून प्रकरणी तिघांना जन्मठेप...का झाला होता खून वाचा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या वादातून गुरुनाथ कटारे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करुन त्यांचा खून करण्यात आला. त्यांच्यासमवेत दुचाकीवर असलेले नबीलाल शेख यांच्यावरही तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी आरोपी प्रमोद ऊर्फ किंगभाई प्रकाश स्वामी, जगदीश ऊर्फ पिंटू रत्नाकर कोन्हेरीकर, प्रदीप ऊर्फ दीपक ऊर्फ दीपू प्रभाकर मठपती यांना जन्मठेप ठोठावली. 


कटारे खून प्रकरणात एकूण 18 साक्षीदार तपासले. त्यात साक्षीदार गोवर्धन व प्रवीण स्वामी यांचे मोबाईल लोकेशन घटनास्थळीच होते. घटनेतील हत्यारे आरोपींनी काढून दिली आहेत. आरोपी मठपती याने न्यायालयाच्या समक्ष दिलेले जबाब ग्राह्य धरण्याबाबत सरकारी वकील ऍड. प्रकाश जन्नू यांनी विविध न्यायालयाचे निवाडे सादर केले. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा ठोठावली. तसेच दोन हजारांचा दंडही सुनावला. न्यायालयाने आरोपींनी यापूर्वी भोगलेली शिक्षा स्टेटऑफ दिली आहे. कटारे खून प्रकरण 13 ऑक्‍टोबर 2014 मध्ये घडले होते. या खटल्यातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, मयताची पत्नी, मुलगा, साक्षीदार अजयकुमार सारंगमठ यांनी सरकारी पक्षास मदत केली नाही, असेही या खटल्यातील सहायक सरकारी वकिलांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. इतर साक्षीदार, पंच, तपासी अधिकाऱ्यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. या प्रकरणात आरोपीतर्फे ऍड. रजाक शेख, ऍड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. 


गुन्ह्यांचा तपास या पथकाने केला 
सोलापुरातील विधानसभा निवडणुकीतील भांडणातून झालेल्या कटारे खून प्रकरणाचा तपास पुणे सीआयडीचे प्रमुख तथा अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकाने केला. त्यामध्ये तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, पुणे गुन्हे अन्वेषण शाखेचे शीतल राऊत, जितेंद्र कदम, सोलापूर गुन्हे अन्वेषण पथकाचे महादेव बिराजदार यांचा समावेश होता. या पथकाने आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा, ७०० कंपन्या फक्त कागदावर, अब्जावधींची कमाई; EDचा दावा

Viral Video: भाजी खरेदीसाठी चक्क रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन थांबली, व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त

IPL Mock Auction : ३०.५० कोटी! कॅमेरून ग्रीन ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू... CSK vs KKR मध्ये कोणी मारली बाजी?

धुरंधर Vs छावा! रणवीर सिंहच्या धुरंधरने मोडले सर्व रेकॉर्ड, 10 दिवसांची कमाई वाचून थक्क व्हाल!

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

SCROLL FOR NEXT