shetakari 
सोलापूर

बळिराजा पुन्हा एकदा झाला हैराण 

सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर ): जगात नैसर्गिक असो अथवा मानवी यापैकी कोणतेही संकट आले, की यात भरकटला जातो शेतकरी. गेल्या उन्हाळ्यात तीव्र दुष्काळ तर पावसाळ्यात महाभयंकर पूर व अलीकडेच अतिवृष्टी या एक ना अनेक अडचणींवर मात करत, कबाडकष्ट करून शेतकरी कसाबसा शेती करत यंदाच्या वर्षात तरी आपल्या कष्टाचे चीज होईल या आशेने बसला असताना कोरोनासारख्या महामारी रोगाने थैमान घातल्याने शेतकरी राजा पुन्हा हैराण झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या बागेतील फळे जाग्यालाच गळून जळून चाललेली दिसत आहेत. 
उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील नागनाथ काशिनाथ हेडगिरे यांची तीन एकर लिंबोणीची बाग आहे. ऐन उन्हाळ्यात फळ चांगली आली असताना अचानक संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन असल्याने पुणे, वाशी येथील मार्केट बंद झाल्याने हेडगिरे यांच्या बागेतील लिंबोणीची फळे वेळीच न काढल्याने जागीच गळून जळून चाललेली आहेत. त्यामुळे त्यांचे यंदा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
हेडगिरे यांनी सात वर्षांपूर्वी तीन एकरांत 320 लिंबोणीची झाडे लावली. दुष्काळी पट्टा असताना देखील त्यांनी चांगल्या रीतीने बाग जोपासली. त्यामुळे दरवर्षी त्यांना वर्षांचे तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळत होते. यंदाही दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टी अशा भयानक परिस्थितीला सामोरे जात त्यांनी बाग जोपासली होती. फळे विक्रीस आली असताना ऐनवेळी अचानक कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाल्याने मार्केट बंद असल्याने बागेतील फळे जागेलाच गळून जळून चालली आहेत. हातातोंडाशी आलेल्या फळांचे कोरोनामुळे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात नैराश्‍याचे वातावरण असून एकीकडे कोरोना तर दुसरीकडे शेतातील फळांचे नुकसान डोळ्यांसमोर दिसत असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. हेडगिरे यांच्यासारखी अनेक शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे. 

वाहतूक व्यवस्था व मार्केट ऐनवेळी अचानक बंद

लिंबोणीच्या फळाचे दरवर्षी चांगले उत्पन्न मिळत असल्याने वर्षभर आम्ही या बागेसाठीच झटत असतो. यंदा देखील मार्च महिन्यात बागेत फळ जोमात आले असताना कोरोनाच्या रोगाने थैमान घातल्याने वाहतूक व्यवस्था व मार्केट ऐनवेळी अचानक बंद झाल्याने फळ जागेलाच गळून सुकून गेली आहेत. 
- काशिनाथ हेडगिरे, बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Book Festival: पुस्तक महोत्सवात ५० कोटींची उलाढाल; ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री, साडेबारा लाख नागरिकांनी दिली भेट

Pune Accident: 'अक्कलकोटचे मायलेक रेल्वेच्या धडकेत ठार'; पिंपरी-चिंचवडमधील घटना, अंत्यविधीसाठी गावी गेले अन्..

Maharashtra Cold Wave : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भात थंडीचा कडाका वाढणार, किमान तापमान ८.६ अंशांवर; हवामान विभागाचा अंदाज समोर

‘परफेक्ट लूक’चा अट्टहास; देशात सौंदर्योपचारांची झपाट्याने वाढ, वर्षभरात १२.८८ लाख प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्याला आजपासून होणार प्रारंभ

SCROLL FOR NEXT