जिल्हा दूध संघ sakal
सोलापूर

सोलापूर : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या सुनबाई दूध संघ बचावच्या उमेदवार

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप आज झाले आहे.

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक आता स्पष्ट झाली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारमधील दिग्गज नेत्यांनी एकत्रित येत सोलापूर जिल्हा दूध संघासाठी महाविकास आघाडीचे पॅनल तयार केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सुनबाई वैशाली जितेंद्र साठे यांना महाविकासच्या पॅनलमधून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी दूध संघ बचाव कृती समितीची उमेदवारी स्वीकारली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित केलेल्या पॅनलला कपबशी तर दूध संघ बचाव समितीला रोडरोलरचे चिन्ह मिळाले आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप आज झाले आहे. दूध संघाच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरवात होणार आहे. महिलांचा प्रतिनिधी मतदार संघातील दोन जागांसाठी मंगळवेढा तालुक्‍यातील निर्मला काकडे व बार्शी तालुक्‍यातील धामणगाव येथील छाया ढेकणे यांना महाविकास आघाडीच्या पॅनेलची उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या विरोधात दूध संघ बचाव समितीने करमाळा तालुक्‍यातील केम येथील संगीता लोंढे व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा येथील वैशाली जितेंद्र साठे यांना उमेदवारी दिली आहे. दूध संघाच्या 17 जागांपैकी 1 जागा बिनविरोध झाली आहे. 16 जागांसाठी निवडणूक लागली आहे. दूध संघ बचाव समितीने क्रियाशिल मतदार संघातील 7, महिला मतदार संघातील दोन, अनुसुचित जाती/जमाती मतदार संघात एक, भटक्‍या जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातील 1 अशा 11 जागांवर उमेदवार दिले आहेत.

प्रमोद बोडके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT