Kharip
Kharip sakal
सोलापूर

Farmer Agriculture : कांद्याच्या फटक्याने सोयाबीन, तूर, उडिदाकडे वाढता कल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - जिल्हाभरात खरीप हंगामासाठी बियाणे बुकिंग जोरात सुरु झाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी कांद्याला फाटा देत सोयाबीन, तूर, उडीद, सूर्यफूल या पिकांना प्राधान्य देतील अशी शक्यता आहे. बियाणे मागणीच्या बुकिंगवरून हा अंदाज वर्तवला जात आहे. योग्य वेळी पाऊस झाला तरच खरिपाची हंगाम यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. खरीप पेरणीच्या पार्श्वभूमीवर, पेरणीवेळी नेमका पाऊस पडेल की नाही याची धास्ती बळिराजाला आहेच.

यावर्षी जून महिन्यापूर्वी बियाणे उद्योगांकडे बियाणे विक्रेत्यांनी मागणीचे बुकिंग सुरु केले आहे. यावर्षी भाकणुकीत वर्तविलेल्या अंदाजानुसार, दुष्काळाची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

त्यातच कांद्याला यावर्षी जोरदार फटका बसला. बाजारात कांद्याचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कोसळले की कांदा उत्पादकाला अक्षरशः मातीमोल भावाने कांदा देण्याची वेळ आली. चांगले उत्पादन होऊन देखील लागवडीचा देखील खर्च निघाला नाही. कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात चांगलेच पाणी आणले. यामुळे यावर्षी कांदा पिकाकडे शेतकरी वळणार नाही असे मानले जाते. त्यामुळे कांदा बियाणाची मागणी कमी झाली आहे.

त्या तुलनेत वेळेत पाऊस झाला तर सोयाबीन, उडीद, तूर या पिकांची लागवड वाढण्याचा अंदाज बियाणे विक्रेत्यांनी बांधला आहे. त्यानुसार यावर्षी विक्रेत्यांनी बियाणे मागणी वाढवली आहे.

ठळक बाबी

- हवामान खात्याकडून सोलापूर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी म्हणजे ४६१ मि.मी. पावसाचा अंदाज

- कांद्याचे लागवड क्षेत्र कमी होणार

- तूर, सोयाबीन, उडीद व सूर्यफुलाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

- खरिपासाठी वेळेत पाऊस पडण्यावर हंगामाचे भवितव्य

- बाजारात बियाणे दाखल होण्यास सुरवात

बियाणे बाजारातील बदल

- तुरीचे बियाण्याच्या भावात वाढ

- सोयाबीन बियाण्याचे भाव स्थिर

- उडीद बियाण्याच्या भाव ‘जैसे थे’

महाबीज कंपनी बियाणे उपलब्धता तपशील

- सोयबीन : दोन हजार क्विंटल (उपलब्ध)

- तूर : तीनशे क्विंटल (उपलब्ध)

- उडीद : ३०० क्विंटल (उपलब्ध)

- मूग : आठ क्विंटल

- जादा बियाणे लवकरच दाखल होणार

यावर्षी पीकनिहाय क्षेत्राचा अंदाज

-सोयाबीन- ८५ हजार हेक्टर

-तूर- ९५ हजार हेक्टर

-मुग- ९ हजार हेक्टर

-उडीद - ७४ हजार हेक्टर

-सूर्यफूल- १३ हजार ५०० हेक्टर

महाबीजकडे सोयाबीन, तूर, उडीद, मूग बियाणे उपलब्ध झाले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. अद्याप कोणतीही सबसिडीची सूचना प्राप्त झालेली नाही.

- गोपाल देवरमनी, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Indian Economy : भारत २०२५ पर्यंत चौथी अर्थव्यवस्था ; जी-२० शेर्पा व निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : मुंबई होर्डिंग दुर्घटनेचे देशभरात पडसाद, रायपूर महानगरपालिकेचे मोठे पाऊल

SAKAL Exclusive : संवेदनशील प्रकरणांत भाजपचे मौन धोकादायक; राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे मत

SCROLL FOR NEXT