बाळू गोविंद सरवदे अंगावर विज पडुन मृत्यु sakal
सोलापूर

Solapur : अंगावर विज पडुन शेतकऱ्याचा मृत्यु

विशेष म्हणजे दोघा भावात केवळ पाच फुटाचेच अंतर

राजकुमार शहा

सोलापुर : शनिवारी दुपारी विजेच्या कडकडाटा सह झालेल्या पावसाने अंगावर वीज पडून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला, तर दुसर्‍या ठिकाणी एका म्हशीचा मृत्यू झाला. बाळू गोविंद सरवदे वय 51रा. नजीक पिंपरी असे मृत शेतकर्‍याचा नाव आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नजीक पिंपरी ता मोहोळ येथील रहिवाशी बाळू सरवदे यांची तांबोळे शिवारात शेती आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे.

पेरणी करण्यासाठी शेतकरी जमिनीच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे याच पार्श्वभूमीवर बाळू सरवदे याचा भाऊ शेतात पेरणी करीत होता, तर बाळू हा पाठीमागे गवत वेचत होता. अचानक आकाशात जोराची वीज कडाडली व ती बाळूच्या अंगावर पडली, त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला.

विशेष म्हणजे दोघा भावात केवळ पाच फुटाचेच अंतर होते. विज पडताच बैल सैरावैरा पळाले मृत बाळू याच्या पश्चात दोन लहान मुले, एक मुलगी, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.

दुसरी घटना कोन्हेरी ता मोहोळ येथे घडली. दुपारी तीन वाजता मेघगर्जने सह पावसाला सुरुवात झाली जनार्दन महिपती मुळे हे शेतात राहतात. त्यांनी म्हैस घराच्या समोर बांधली होती. दुपारी अचानक जोराची वीज कडाडली व ती म्हशीवर पडली त्यामुळे म्हशीचा मृत्यू झाला. या घटनेचा अहवाल गावकामगार तलाठी व्ही.एच. चव्हाण यांनी महसूल प्रशासनाला दिला आहे. अंगावर वीज पडून जनावर दगावण्याची कोन्हेरी येथील आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT