Voter List Sakal
सोलापूर

सोलापूर : महापालिका, जिल्हा परिषदेसाठी ५ जानेवारीपर्यंत अंतिम यादी

अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी आज राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महानगरपालिक, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने कालबध्द कार्यक्रम आखावेत, मतदार जनजागृतीसाठी ऑनलाईन वेबीनार घ्यावेत, ५ जानेवारी २०२२ पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी आज राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त श्री. मदान, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर, निवडणूकचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी यांना महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये मतदार यादी अद्ययावत व शुध्द होण्याच्या दृष्टिने ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्‍टोबर दरम्यान मतदार पडताळणी कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

दुबार, समान नोंदणी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देवून पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबविण्याकरीता जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी समन्वयाने मतदान जागृती करणे, मतदार यादी शुद्धीकरण करण्यासाठी, मतदार नोंदणी बाबत

नागरिकांना आवाहन करावे. राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी यांच्या बैठका घेवून त्यांना आगामी निवडणुकाबाबत आवगत करणे, महाविद्यालय, म.न.पा. शिक्षण मंडळाच्या व शिक्षण मंडळ जिल्हा परिषद यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या माध्यमिक शाळेमध्ये मतदार जागृती अभियान राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

  • प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी : १ नोव्हेंबर

  • प्रारूप मतदार यादीवर दावे, हरकती स्विकारण्याची मुदत : ३० नोव्हेंबर

  • दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत : २० डिसेंबर

  • अंतिम मतदार यादी करण्यास मुदत : ५ जानेवारी २०२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT