फसवणूक! Sakal
सोलापूर

Solapur Crime News : माजी आमदारपुत्राची २५ लाखांची फसवणूक

जमिनीचा न्यायालयीन वाद लपवून पैसे घेतल्याची राजेश पाटलांची तक्रार

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : शिवाजी नगर बाळे येथील जमिनीच्या व्यवहारापोटी तिघांनी २५ लाख रुपये इसारा घेतला. परंतु, त्यांनी संगनमत करून भावासोबत सुरु असलेला न्यायालयीन वाद लपविला. जमिनीच्या व्यवहारापोटी दिलेली रक्कम त्यांनी परत न केल्याने माजी आमदारपुत्र राजेश सिद्रामप्पा पाटील यांनी सदर बझार पोलिसांत धाव घेतली आहे. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी राजेश पाटील (रा. सुदीप कॉम्प्लेक्स, होटगी रोड) यांचे सिद्धेश्वर एंटरप्रायझेस नावाचे फर्म आहे. त्याचे कार्यालय दक्षिण कसबा परिसरात असून फिर्यादीचा मित्र गुरूनाथ येलेटी यांच्या ओळखीतून सुभाष रंगनाथ लोहार, भूषण सुभाष लोहार व रत्नकुमार सुभाष लोहार (तिघेही रा. सोलापूर) यांची जमीन विक्रीसंदर्भात समजले.

बाळे शिवाजी नगर परिसरात लोहार यांची ११ हेक्टर ५७ आर (२८ एकर सात गुंठे) जमीन आहे. फिर्यादी राजेश पाटील व लोहार यांच्यात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला. त्या जमिनीसाठी १२ कोटी रुपये देण्याचे ठरले. सुरवातीला इसारापोटी २५ लाख रुपये देण्याचे ठरले आणि सर्वांसमोर एक लाख आणि २४ लाख युनियन बॅंकेच्या धनादेशाद्वारे दिले.

परंतु, संशयित आरोपींचा भाऊ राजेंद्र लोहार यांच्यासोबत जमिनीवरून वाद सुरु आहे. तो वाद सध्या दिवाणी न्यायालयात दाखल असून त्याची माहिती तिघांनी लपवून पैसे घेतले, असेही फिर्यादीत नमूद आहे. वारंवार पैसे मागूनही २५ डिसेंबर २०२२ पासून त्यांनी घेतलेले पैसे परत केलेले नाहीत, असेही पाटील यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार श्री.औदुंबर आटुळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बनावट FIF, CBI नोटीस आणि Supreme Court ची कागदपत्रे... ज्येष्ठ नागरिकाची १.४७ कोटींची सायबर फसवणूक कशी झाली?

Latest Live Updates Marathi: पाच कोटींच्या खंडणीसाठी गुत्तेदाराचे अपहरण; मुख्य अभियंत्याच्या चालकासह चौघे जेरबंद

Privacy Risk : धक्कादायक खुलासा! मोबाईल, लॅपटॉप काही सेकंदांनी घेतोय सिक्रेट स्क्रीनशॉट; सुरक्षा धोक्यात, लगेच बंद करा 'ही' सेटिंग

तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर कोण? वैभव सूर्यवंशी नाही तर दुसराच खेळाडू रोहितचा उत्तराधिकारी, सेहवागने सांगितलं नाव

अरे जा आता गप्प... T20 मुंबई लीगमध्ये राडा, बॉलरने मग काढला वचपा... VIDEO

SCROLL FOR NEXT