solapur gram panchayat election update 26 grampanchayat 14 percent voting in 2 hours esakal
सोलापूर

Solapur Gram Panchayat Election : 26 ग्रामपंचायतसाठी 2 तासात 14.4% इतके मतदान

हिवरगाव या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सहा सदस्य बिनरोध निघाले मात्र एका जागेसाठी ही निवडणूक

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : 26 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासात 14.4% इतके मतदान झाल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. तालुक्यातील 27 ग्रामपंचायत मधील ब्रम्हपुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. हिवरगाव या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सहा सदस्य बिनरोध निघाले मात्र एका जागेसाठी ही निवडणूक लागली.

एकूण 26 सार्वत्रिक व एका पोट निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.प्रचारादरम्यान अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले .काही गावात किरकोळ वादाचे प्रसंग देखील उद्भवले. रस्त्यालगत असणारे ढाबा संस्कृती ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे निवडणूक काळात हे ढाबे फुल असल्याचे दिसून आले.

तालुक्यातील शेलेवाडी, शिरशी, खडकी, जुणोनी, देगाव, अकोले, बठाण, उचेठाण, महमदाबाद हुन्नर, रेवावाडी, चिक्कलगी, भाळवणी, जंगलगी, डीकसळ, मुंढेवाडी, खुपसंगी, निंबोणी, लोणार, लमाणतांडा, मानेवाडी, लक्ष्मी दहिवडी, रड्डे, नंदूर, आंधळगाव, पडोळकरवाडी, जालिहाळ, हिवरगाव या गावातील एकूण 70 उमेदवार सरपंच पदासाठी तर एकूण 517 उमेदवार सदस्य पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.

या निवडणुकीसाठी 94 केंद्रावरती मतदान होणार सकाळी 7.30 वाजता मतदानात सुरुवात झाली पहिल्या दोन तासात 52 हजार 809 मतदारांपैकी 3738 पुरुष व 3677 स्त्रिया असे एकूण 7415 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात कमी मतदान भाळवणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन मध्ये 6.63% झाले तर सर्वात जास्त मतदान देगाव ग्रामपंचायतीसाठी प्रभाग तीन मध्ये 29.22% इतके मतदान असून त्यासाठी 115 मतदान पथके तैनात करण्यात आली.

या पथकांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई तसेच राखीव पथकातील कर्मचारी असे एकूण 690 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी एकूण 94 कंट्रोल युनिट व 135 बैलेट युनिट वापरण्यात येणारी आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून 23 निवडणूक निर्णय अधिकारी, 23 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT