aandolak.jpg 
सोलापूर

सोलापूूरमध्ये मानधनाच्या मागणीसाठी आरोग्य कर्मचारी उतरले रस्त्यावर 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासमोर शहरातील विवीध भागात काम कोरोना सर्वेक्षण व उपचारसेवेत काम करणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना ना मागील महिन्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर एकत्र येत आंदोलन केले. 

शहरामध्ये मनपाने कोरोना आजाराचे सर्वेक्षण व इतर आरोग्य कामासाठी या कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर नियुक्ती केली. मनपाने निश्‍चित केलेले कोविड हॉस्पिटलमध्ये त्या काम करतात. उर्वरीत महिला कर्मचारी शहरात आरोग्य सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. 

मागील महिन्यापासून त्यांना मानधन वाटप केलेले नाही. तातडीची गरज म्हणून या महिला कर्मचारी कामावर रुजू झाल्या. मात्र त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध केलेले नाही. त्यांना जे आजारापासून संरक्षण करण्यासाठी दिलेले एकच कीट महिनाभर वापरावे लागत आहेत. प्रत्यक्षात ते आठवड्यांना बदलून दिले पाहिजे. अनेक कर्मचारी या बाहेरगावावरून कामाच्या ठिकाणी येतात. त्यांना कोणतीही भोजनाची सेवा दिलेली नाही. तसेच काम सोडून बाजारात जाता येत नसल्याने त्यांची उपासमार होते आहे. ज्या महिला कामाच्या ठिकाणी वाहने घेऊन जातात त्यांना पोलिस अडवतात. त्यांना अत्यावश्‍यक सेवेचे ओळखपत्र नसल्याने विनाकारण पोलिस कारवाई होते. अशा स्थितीत कामावर पोहोचण्यास वेळ होतो. आता पून्हा लॉकडाउन होणार असेल तर त्यांना कामाच्या ठिकाणी पोहचण्याबाबत सुरक्षिततेचे उपाय केलेले नाहीत. सॅनिटायझरची सोय नसल्याने संसर्गाचा धोका बाळगत काम करावे लागते. 
मागील महिन्याचे मानधन महिन्याच्या सुरवातीला जमा होणे अपेक्षित असताना अद्याप जमा झालेले नाही. अनुदान आले नाही अशी कारणे सांगितली जात आहेत. या महिला कर्मचारी आठ तास कामाचा नियम असताना त्यांना त्यापेक्षा अधिक वेळ काम करावे लागत आहे. तसेच सर्व कामे करून पुन्हा ऑनलाइन नोंदणीची सक्ती केली जात आहे. प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांकडे ऑनलाइनसाठी लागणारे ऍड्राईड मोबाईल नाहीत. तरीही त्यांच्यावर ऑनलाइनची कामे लादली जात आहेत. 
तसेच कोरोना संसर्गाच्या क्षेत्रात काम करत असताना आवश्‍यक्तेनुसार त्यांची तपासणी करून क्वारंटाईन करण्याचे काम केले जात नाही. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका कायम असतो. रुग्णालयासमोर जमलेल्या दिडशे ते दोनशे महिला कर्मचारी आंदोलनासाठी एकत्र जमलेले पाहून पोलिसांनी विना परवानगी एकत्र येऊन संचारबंदीचा नियम तोडल्याबद्दल त्यांना ताब्यात घेतले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT