water
water sakal
सोलापूर

सोलापूर : कंपोस्ट खताच्या उकिरड्यापासून गरम पाणी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शेतात घराजवळ कंपोस्ट खताचा खड्डा असून त्यामध्ये म्हशीचे शेण व गोठ्यातील, घरातील ओला व सुका कचरा टाकला जातो. त्या खड्ड्यातील कंपोस्ट खत शेतात टाकत असताना त्यातून गरम हवा बाहेर येत होती. वर्गशिक्षिकांकडे त्याबद्दल विचारणा केली आणि पाचवीतील चिमुकल्यांनी चोवीस तास गरम पाण्याचा प्रकल्प साकारला.

कंपोस्ट खताच्या खड्ड्यातील उष्णतेचा उपयोग करुन घरात गरम पाणी आणता येईल, अशी कल्पना हर्षवर्धन विनायक इंगळे व सुमीत समाधान शिंदे यांना सूचली. त्यांनी गोठ्याजवळील शेणाच्या उकिरड्यात ठिबक सिंचनासाठी वापरला जाणारा काळा पाईप टाकला. पाईपमधून गरम हवा बाहेर येत होती. त्यानंतर एका बाजूने पाणी सोडले, तेव्हा दुसऱ्या बाजूला गरम पाणी येऊ लागले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन इंची व्यासाचा काळा पाईप वापरुन तसा प्रयोग केला. कचरा विघटनामुळे त्यातून ४२ ते ६० सेल्सिअंश उष्णता बाहेर पडते आणि त्याचा वापर करूनच पाणी गरम करण्याचा हा प्रयोग आहे. चार सदस्यांच्या कुटुंबाला पुरेल एवढे ६० ते ७० लीटर थंड पाणी (साधारण ४० ते ४८ से. तापमानावर) काही तासांनंतर गरम झाले. हा प्रयोग वर्गशिक्षक पैगंबर तांबोळी, वैज्ञानिक अरुण देशपांडे आणि प्रिसिजन फाउंडेशन व सर फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार उपक्रमापर्यंत पोहोचला. त्या चिमुकल्यांचे सर्वांनीच कौतुक केले. चिमुकल्यांच्या कल्पनाशक्‍तील वाव देण्यासाठी प्रिसिजन कंपनीचे यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, आविष्काराचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्‍वर निंबर्गी, तिपन्ना कमळे, बाबासाहेब शिंदे, अनघा जहागीरदार, राजकिरण चव्हाण, नवनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

तुम्हीही करा तुमच्या घरी प्रयोग

घराजवळ मोठा खड्डा करुन त्यात गवत, जनावरांचे शेण, घरातील व जनावरांच्या गोठ्यातील ओला, सुका कचरा टाकून भरला जातो. तत्पूर्वी, खड्ड्यातील उष्णता बाजूला जाऊ नये म्हणून तो खड्डा जनावरांच्या शेणाने सारवावा लागतो. घरावरील अथवा घराजवळील पाण्याच्या टाकीतून आलेल्या दोन इंच व्यासाचा पाईप कंपोस्ट खताच्या खड्ड्यातून स्नानगृहात जोडला जातो. दरम्यान, विविध टप्प्यांवर पाण्याच्या टाकीतून आलेला पाईप चार-पाच वेटोळे करून त्या खड्ड्यात बुजविला जातो. त्यामुळे पाण्याच्या टाकीतून आलेला पाईप कंपोस्ट खताच्या खड्ड्यातून गेल्याने टाकीतील पाणी गरम होऊन स्नानगृहात वापरता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT