By Solapur Janata Bank Help with CM, PM Care 
सोलापूर

सोलापूर जनता बॅंकेतर्फे सीएम, पीएम केअरला मदत

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सध्या जगभर कोरोनारूपी महाभयंकर राक्षसाने सर्व जगाला ग्रासले आहे. अशा परिस्थितीत आपल्या भारतात उद्‌भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देश, जिल्हा व शहर पातळीवर सगळीकडेच या कोरोनाग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून प्रत्येकजण आपली भूमिका बजावत आहे. यात सोलापूर जनता सहकारी बॅंक देखील मागे नाही.


फक्त अर्थकारणच न करता समाजकारण देखील करण्यासाठी जनता बॅंक कधीही मागे राहिलेली नाही. याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर जनता सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान आर्थिक मदत निधीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात आले आहेत.

मदत निधीचा धनादेश बॅंकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे, उपाध्यक्ष वरदराज बंग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वाईकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेल्या मदत निधी संकलन केंद्रामध्ये सुपूर्द केला. या वेळी जनता बॅंकेच्या अध्यक्षांनी सोशल डिस्टन्सिंगचा मेसेज देखील समाजामध्ये पोचवला.

धनादेश थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती न देता सहायता केंद्राच्या बॉक्‍समध्ये ठेवून दिला. या वेळी बॅंकेचे अध्यक्ष श्री. देशपांडे यांनी, जनता बॅंकेच्या वतीने गरीब, गरजू आणि मजूर लोकांसाठी 500 अन्नधान्य किट ज्यात गहू, तांदूळ, डाळी व तेल अशा प्रकारचे धान्य असणार आहे, ही मदत म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला देखील देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Leader Attack: अकोल्यात काँग्रेस नेत्यावर हल्ला; भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दाखल आहे गुन्हा

ECI notice to Mohammed Shami: मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस!, जाणून घ्या, नेमकं काय कारण?

Mumbai Local: मुंबई लोकलच्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! १८ डब्यांची लोकल लवकरच धावणार; चाचणी घेणार, पण कधी?

Vijay Hazare Trophy: संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला, पण विष्णू विनोदनं ठोकले १४ सिक्स; ऋतुराज गायकवाडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Ambegaon News : स्वातंत्र्यपूर्व परंपरेचा जिवंत वारसा; वर्षातून एकदाच भरणारा वळतीचा शिळा बाजार!

SCROLL FOR NEXT