solapur land dispute civil court land encroachment marathi news Sakal
सोलापूर

Solapur News : दिवाणी न्यायालयातून हमखास न्याय; जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी खबरदारी महत्त्वाची

जमिनीची मालकी एका व्यक्तीची, पण दुसराच व्यक्ती हेतुपुरस्सर त्या जमिनीवर किंवा जागेवर अतिक्रमण करतो.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: जमिनीची मालकी एका व्यक्तीची, पण दुसराच व्यक्ती हेतुपुरस्सर त्या जमिनीवर किंवा जागेवर अतिक्रमण करतो. त्या जमिनीवर मालकीचा दावा सांगतो. जमिनीवरील अतिक्रमण हे बांधकामाच्या किंवा ताबा मिळवण्याच्या स्वरूपात असते. अशावेळी अतिक्रमण हटवण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागता येते.

समोरील व्यक्तीने कोणताही कायदेशीर करार न करता जागा मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या इच्छेविरुद्ध एखाद्या भूभागावर ताबा सांगणे, याला अतिक्रमण असे म्हटले जाते. त्यात शेतात बांध घालणे,

शेतीवर ताबा मिळवणे, दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीतील काही भागात बांधकाम करणे (हौद, जिना असे), दुसऱ्याच्या मालकीची जमीन स्वत:ची असल्याचा दावा करणे अशा बाबींचा समावेश होतो. त्यासाठी दिवाणी न्यायालयातून दाद मागता येते. पण अतिक्रमण होऊ नये म्हणून वेळोवेळी खबरदारी घेतल्यास भविष्यातील वाद उद्‌भवत नाहीत हे तितकेच खरे आहे.

अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कोणाची?

खासगी जमिनीवरील अतिक्रमणात शासकीय यंत्रणा, तहसीलदार, जिल्हाधिकारी दखल देऊ शकत नाही. ते हटवण्याची जबाबदारी संबंधित जमीन मालकाचीच असते.

नेमकी हीच बाब अनेकांना माहिती नसल्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी ते सरकारी कार्यालयात अर्ज करतात, खेटे मारतात. पण त्यात फक्त वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे खासगी जागेवर अतिक्रमणाविरोधात वेळ वाया न घालवता थेट दिवाणी न्यायालयात दाद मागायला हवी.

अतिक्रमण टाळण्यासाठी तीन उपाय...

  •  जमिनीचा मूळ मालक बाहेरगावी वास्तव्यास असल्यास जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील विश्वासू व्यक्तीकडे (पॉवर ऑफ अटर्नी) सोपवता येऊ शकते

  •  जमिनीच्या संरक्षणासाठी भाडेकरू नेमता येईल, पण भाडेकरू ठेवणार असल्यास जवळील पोलिस ठाण्यात त्याचे व्हेरिफिकेशन करून घ्यावे

  •  आपल्या मालकीच्या जमिनीला कंपाऊंड करता येईल. मालमत्तेभोवती बोर्ड लावता येईल आणि वेळोवेळी जमिनीला भेट देऊन पाहणी करावी

अतिक्रमण हटवण्याची अशी आहे कायदेशीर प्रक्रिया...

खासगी जमिनीवर किंवा जागेवर अतिक्रमण झाल्यास त्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करता येते. पण, पोलिस लगेचच कारवाई करतील, अशी अपेक्षा करता येत नाही. कारण खासगी जमिनीवरील अतिक्रमण ही बाब दिवाणी स्वरुपाची आहे.

याबाबत कारवाईचे अधिकार पोलिसांना नाहीत. खासगी मालकीच्या जमिनीतील अतिक्रमण दूर करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागणे हाच एकमेव उपाय आहे. पण, अतिक्रमणाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याचा दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून वापर करता येतो.

जमिनीवरील मूळ मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे, जमीन मोजणीचा नकाशांसह दिवाणी न्यायालयात दाद मागावी. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कोर्ट कमिशन नेमून संबंधित भूभागाची किंवा जमिनीची मोजणी केली जाते. त्यानंतर अतिक्रमण झाले की नाही हे सिद्ध होते आणि पुढील कार्यवाही पार पडते.

अतिक्रमणाची प्रमुख ४ कारणे...

  • जमिनीचा मालक बाहेरगावी राहत असेल तर

  • दिवसेंदिवस वाढत चाललेले जमिनीचे दर

  • वारस नसलेले कुटुंब किंवा गरीब कुटुंबाची जमीन हडपणे

  • प्लॉटला कंपाऊंड किंवा शेतजमिनीच्या बांधाला खुणा नसेल तर.

ज्यांच्या जागा किंवा जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, त्यांना दिवाणी न्यायालयातून निश्चितपणे न्याय मिळतो. त्यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन संबंधितांनी त्यांच्याकडील पुराव्यांनिशी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे अपेक्षित आहे.

- ॲड. जयदीप माने, कायदेतज्ज्ञ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT