Solapur Lok Sabha MP Praniti Shinde esakal
सोलापूर

Praniti Shinde : लोकसभेत तब्बल 65 हजारांचं मताधिक्य; मोहोळ तालुक्याच्या खासदार प्रणिती शिंदेंकडून अपेक्षा वाढल्या

प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून 65 हजारांचे मताधिक्य मिळालेय.

राजकुमार शहा

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Highway) केंद्रबिंदू व राज्याच्या नकाशावरील तालुका म्हणून मोहोळचा परिचय आहे.

मोहोळ : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून (Mohol Assembly Constituency) ना भूतो न भविष्यती असे 65 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने मतदार संघातील नागरिकांच्या खासदार शिंदेंकडून अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या पाच वर्षाच्या कालावधीत अपेक्षापूर्ती होईल का? अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे.

यापूर्वी सोलापूर लोकसभा मतदार संघातून (Solapur Lok Sabha Constituency) माजी खासदार सुशीलकुमार शिंदे, अॅड. शरद बनसोडे, जय सिद्धेश्वर महास्वामी अशी मान्यवर नेते मंडळी निवडून गेली आहेत. मतदारांनी त्यांना भरभरून सहकार्य ही केले. मात्र, मतदारांच्या पदरी निराशाच राहिली. साधे साधे प्रश्नही सुटले नाहीत. त्यामुळे मोहोळ विकासापासून कोसो दूर राहिले. प्रत्येकाने केवळ राजकारणासाठी वापर केला.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Highway) केंद्रबिंदू व राज्याच्या नकाशावरील तालुका म्हणून मोहोळचा परिचय आहे. उजनी कालवा, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजना या पाणी स्त्रोतामुळे तालुक्यात द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, केळी या फळबागांचे क्षेत्र वधारले आहे. शेतकरी चांगल्या प्रतीचा माल उत्पादित करू शकतो. मात्र, त्यावर होणारा कृषी प्रक्रिया उद्योग नसल्याने मोत्या सारखा माल मातीमोल दराने विकावा लागतो, त्यामुळे तालुक्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे आहे, तरच शेतकरी टिकणार आहे.

तालुक्यात सुशिक्षित बेकारींची ही संख्या कमी नाही. त्यांच्या हाताला आज काम नाही. मोहोळला नैसर्गिक वातावरण चांगले असल्याने या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी नवीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे, त्यामुळे युवकांची व्यसनाधीनता कमी होणार आहे व त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटणार आहे. आमदार यशवंत माने यांनी रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधीचा विकास निधी आणला. मात्र, आजही शहराशी सर्व गावांना जोडणारे पक्के रस्ते नाहीत, ते होणे गरजेचे आहे.

मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या भीमा व सिना या नद्यांवर बंधारे झाले तर सिंचन वाढणार आहे. त्यामुळे चार साखर कारखाने क्षमतेने चालणार आहेत. मोहोळ शहरासह तालुक्यात व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. मोहोळला रेल्वे स्टेशन ही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस यासह अन्य लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबाव्यात यासाठी मोहोळवासियांनी विविध नेते व विभागाकडे निवेदनांचा पाऊस पडला आहे. मात्र, अद्याप या मागणीला यश आले नाही.

कोरोनाच्या आधी इतर लांब पल्याच्या रेल्वे गाड्या थांबत होत्या, मात्र कोरोनानंतर त्या थांबत नाहीत. रेल्वे थांबल्या तर व्यापारी सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत माल खरेदी करून परत येऊ शकतो, त्यामुळे व्यापार वृद्धी होणार आहे. बाजार पेठेतील उलाढाल वाढणार आहे. पुढील पंचवार्षिक निवडणुकीत आता मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जादा मताधिक्याची अपेक्षा असेल, तर ही कामे होणे गरजेची आहेत, अन्यथा मतदारांना विचार करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT