solapur lok sabha sc 38 candidates file nomination karnataka politics Sakal
सोलापूर

Solapur Lok Sabha Election : अनुसूचितच्या आठ जातींमधील ३८ उमेदवार; कर्नाटकातील वड्डर, बेडा जंगमचा राजकीय प्रयोग

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात व्होट बँकेचेही राजकारण यशस्वी होऊ शकते, याची जाणीव २०१९ च्या निवडणुकीत झाली.

प्रमोद बोडके,

सोलापूर : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात व्होट बँकेचेही राजकारण यशस्वी होऊ शकते, याची जाणीव २०१९ च्या निवडणुकीत झाली. भाजपने ही निवडणूक जिंकली. मात्र, नंतर बिघडलेल्या समीकरणांमुळे २०२४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातील संदर्भ बदलले आहेत.

सोलापूरसाठी यंदा अनुसूचितच्या ८ जातींमधील ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कर्नाटकातील वड्डर, बेडा जंगम, होलार, मोची या देखील समाजातील व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक २०१४ पासून खुल्या जागेसारखी चुरशीची व प्रतिष्ठेची होऊ लागली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे मतदार सर्वाधिक व निर्णायक आहे.

या मतदारसंघातील हीच नस ओळखून भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लिंगायत कार्ड खेळत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना मैदानात उतरविले होते. त्यानंतर या मतदारसंघातील डाव-प्रतिडाव बदलून गेले आहेत. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘लोकल आणि ओरिजनल’ या बद्दल सुरवातीपासूनच आग्रह राहिल्याचे दिसले.

महाराष्ट्रात ५९ अनुसूचित जाती

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६ चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या ५९ जाती आहेत. त्यामध्ये १. अगेर, २. अनमुक, ३. आरेमाला, ४. आरवा माला, ५. बहना, बहाना, ६. बाकड, बंट, ७. बलाही, बलाई, ८.

बसोर, बुरुड, बांसोर, बांसोडी, ९. बेडाजंगम, बुडगा जंगम, १०. बेडर, ११. भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी,

सूरज्यरामनामी, १२. भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, १३. बिंदला, १४. व्यागारा, १५. चलवादी, चन्नया, १६. चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी, १७. डक्कल, डोक्कलवार, १८. ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर, १९ डोम, डुमार, २०. येल्लमलवार, येल्लमलवंडलु, २१.

गंडा, गंडी, २२. गरोडा, गारो, २३. घासी, घासीया, २४. हल्लीर, २५. हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, २६. होलार, व्हलार, २७. होलय, होलेर, होलेया, होलिया, २८. कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्हा), २९. कटिया, पथरिया, ३०. खंगार,

कनेरा, मिरधा, ३१. खाटिक, चिकवा, चिकवी, ३२. कोलूपूल-वंडलु, ३३. कोरी, ३४. लिंगडेर, ३५. मादगी, ३६. मादिगा, ३७. महार, मेहरा, तराळ, धेगू-मेगू, ३८. माहयावंशी, घेड, वणकर, मारु-वणकर, ३९.माला, ४०. माला दासरी, ४१. माला हन्नाई, ४२. माला जंगम, ४३. माला मस्ती, ४४. माला साले, नेटकानी, ४५. माला सन्यासी, ४६.

मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, ४७. मांग-गारोडी, मांग-गारुडी, ४८. मन्ने, ४९. मस्ती, ५०. मॅघवाल, मॅघवार, ५१. मिठा, अयलवार, ५२. मुक्री, ५३. नाडिया, हादी, ५४. पासी, ५५. सांसी, ५६. शेणवा, चेणवा, सेडमा, रावत, ५७. सिंधोल्लू, चिंदोल्लू, ५८. तिरगार, तिरबंदा, ५९. तुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT