Solapur loksabha Constituency
Solapur loksabha Constituency sakal
सोलापूर

Solapur loksabha : लोकसभेच्या आखाड्यात विधानसभेची रंगीत तालीम, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे शक्ती प्रदर्शन

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : लोकसभेची निवडणूक विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत गट बांधणी करण्यात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शक्ती प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरले. हे शक्तिप्रदर्शन भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

या मतदारसंघात प्रशांत परिचारक यांनी माघार घेतल्यामुळे 2021 च्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले केंद्रात व राज्यात सत्ता असताना देखील या मतदारसंघातील प्रमुख प्रश्न सोडवण्यात अपयश आले. त्यामध्ये महात्मा बसवेश्वर व चोकोबा स्मारक याशिवाय दुष्काळाच्या ट्रिगर वन मध्ये तालुक्याचा समावेश नसणे, खरीप हंगामातील पिक विमा भरपाई साठी शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, टँकर यावरून ग्रामीण भागात नाराजीचा सूर आहे ही नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आक्रमक पावणे उचलले जात नसल्याचे प्रशांत साळे यांच्या चोकोबा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात जवळपास 18 गावात पाण्याचे टँकर सुरू करून सुरू केले लोकसभेला तालुक्यातून आतापर्यंत काँग्रेसला मताधिक्य मिळत गेले याही निवडणुकीत मात्र भाजप उमेदवाराला मताधिक्य देण्याचा दावा करण्यात आला.

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळलेल्या गोपनीय माहितीनुसार या मतदारसंघात भाजप उमेदवारास कमी मते पडण्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यामध्ये लक्ष घालण्याचे सूचना दिल्या त्यानंतर परिचारक गट व शिवसेनेची स्वतंत्र बैठक घेतली या बैठकीत झालेल्या नाराजी वरून परिचारक गटाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना निवडणुकीत सक्रिय लक्ष घालण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशांत परिचारक यांनी काल मंगळवेढा येथे मोठे शक्ती प्रदर्शन करत केंद्राने ग्रामीण जनतेसाठी राबवलेल्या योजना याची माहिती देत भविष्यात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याचा आधार देत उद्याचा दिवस आपलाच असल्याचे संकेत दिले त्यामुळे ते आगामी विधानसभेचे उमेदवार असल्याची चर्चा यावेळी उघडपणे बोलले जाऊ लागले.

समविचारी आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष तानाजी खरात व संचालक मंडळ यांनी कारखान्याचा कारभार उत्तम रित्या करून ऊस उत्पादकाची देयके वेळेत अदा करण्याचे काम केले त्याचा फायदा परिसर काना पुढील राजकीय वाटचालीत होऊ शकतो त्यामुळे यापुढील काळात रामकृष्ण नागणे, युन्नुश शेख, औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, दिगंबर भाकरे, बबलू सुतार, शिवाजी नागणे, भारत पाटील, राजेंद्र पाटील, सचिन चौगुले ,माधवानंद आकळे, श्रीकांत गणपाटील यासह अनेक परिचारक समर्थकाला प्रयत्नाची पराकष्टा करावी लागणार आहे त्यासाठी लोकसभा निवडणुकीत आपले कर्तृत्व दाखवावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT