solapur birds news esakal
सोलापूर

Solapur : सोलापूरची माळराने पक्ष्यांनी गजबजली

थंडीच्या आगमनासोबत अनेक पक्षी दाखल, पंधरवडाभरात फ्लेमिंगो येणार

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : पाऊस थांबून थंडीचे आगमन होताच जिल्ह्यातील माळरानावर पक्ष्यांची गर्दी वाढू लागली आहे. अनेक पक्षी विदेशातून स्थलांतर करून या पंधरवडाभरात दाखल होतील.महाराष्ट्रात माळरानावरील जैवविविधतेचे आगार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात हिवाळी हंगाम नुकताच सुरु झाला आहे. जमिनीतील ओल व दवबिंदूमुळे अद्याप हे गवत काही आठवडे हिरवे राहणार आहे.

मॉंटेग्यू हॅरीअर (भोवत्या), पांढरुका भोवत्या दिसू लागले आहेत. कॉमन कॅस्ट्रॉल, लेसर कॅस्ट्रॉल, रोझी स्टर्लिंग (गुलाबी मैना), स्पाईड स्टर्लिंग या पक्ष्यांची संख्या वाढली आहे. लाल डोक्याचा भारीट, काळ्या डोक्याचा भारीट, स्वर्गीय नर्तक हे पक्षी पाहण्यास मिळत आहेत. पाणथळ जागेत लेसल डिसलींग डक, चित्रबलाक हे पक्षी दाखल झाले आहेत.

जैवसाखळीतील प्रमुख पक्षी रेड नेक्ड फाल्कन (लाल डोक्याचा ससाणा), लॅगर फाल्कन, टॉनी इगल, बोनालीज इगल हे वास्तव्याला आहेत. या शिवाय लांडगा व खोकड यांचा प्रजनन काळ सुरु झाला आहे. यावर्षीचे निरीक्षण म्हणजे समुद्रावरील चक्री वादळ, मोठा पावसाचा अंदाज आल्याने सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे.

पाऊस थांबल्याने येत्या पंधरवडा-भरात विदेशी पक्षी येण्यास सुरवात होईल. यामध्ये फ्लेमिंगो, बार हेडेड गुजची संख्या वाढेल. यावर्षी माळरानावर पावसाने भरपूर गवत असल्याने या हंगामात निसर्ग निरीक्षणाची संधी खूप मोठी असणार आहे.

- शिवानंद हिरेमठ, निसर्ग अभ्यासक, सोलापूर

ठळक बाबी

- पंधरवड्यात बार हेडेड गुज, शॉर्ट इअर ओल (आखूड कानाचा घुबड), फ्लेमिंगो येणार

- शॉर्ट टोड लार्क, ग्रेटर शेडेड लार्क हे छोटे पक्षी दाखल

- चित्रबलाक, लेसर डिसलींग डक दाखल

- रेड नेक्ड फाल्कन, ॲंगर फाल्कन, टॉनी इगल, बोनालीज इगल दाखल

- पिपेट पक्ष्यांची हजेरी

- सर्पमार गरुडांकडून जुन्या घरट्यांची दुरुस्ती

- माळरान निरीक्षणाची तयारी

- पायवाटावरून पायी जात करावी पाहणी

- मोबाईलचा आवाज बंद असावा

- शक्यतो निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगाचे कपडे वापरावेत

- वनविभागाची रितसर परवानगी घ्यावी

- सोबत प्लॅस्टिक बॅग नेऊ नये व माळरानातील प्लॅस्टिक कचरा गोळा करून आणावा

- गवताचे प्रकार, गवत फुले, फुलपाखरे, बेडूक, पक्षी याचे निरीक्षण करून नोंदी कराव्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT