mumbai sakal
सोलापूर

Solapur : आमदार नसलेल्या मंगळवेढ्यातील शिवसैनिक ठाकरेसोबत

मंगळवेढा तालुक्यात शिवसेनेचा फारसा प्रभाव नसला

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : शिवसेना की शिंदे गटाचा दसरा मेळावा जोरात होणार याची माध्यमात चर्चा सुरू असताना मंगळवेढा पंढरपूर मतदार संघात शिवसेनेचा आमदार नसताना देखील या मतदारसंघातून शिवसैनिक स्वखर्चाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला चटणी भाकरीच्या सोबतीने उपस्थित झाले.

मंगळवेढा तालुक्यात शिवसेनेचा फारसा प्रभाव नसला तरी शिवसेनेला मानणारा ठराविक मतदार मात्र कायम राहिला आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यानंतर मतदार संघाची पुनर्रचना झाल्यामुळे या मतदारसंघातील बरेच गावे इतर मतदारसंघाला जोडले गेले व मंगळवेढा शहर व ग्रामीण भाग हा पंढरपूरला जोडला सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 45 हजाराच्या आसपास मते घेतली होती. मतदार संघात शिवसेनेला आमदार मिळवता नाही मात्र शिवसैनिक निर्माण करता आला, मंगळवेढ्यातील बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजना च्या आंदोलनाची धग धनमानसामध्ये वाढवण्याचे काम शिवसेनेचे तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी कागदपत्रासह केले त्यामुळे या आंदोलनाचा वनवा देशभर झाला.

2019 च्या राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करीत मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले त्या क्षणी कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात आला त्यामुळे दोन वर्ष नागरिकांना अनेक संकटाला सामोरे जावे लागले परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची घेतलेली जबाबदारी व नागरिकांना केलेल्या आवाहनाचे मंगळवेढ्यातील जनतेनी तंतोतंत पालन केले. त्याच काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नी तत्कालीन स्व.आ. भारत भालके यांना या मतदारसंघाची काळजी घेण्याबाबत केलेले आवाहन सर्वश्रुत आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल जनतेमध्ये एक वेगळे असता आहे.

अशा परिस्थितीत दोन महिन्यापूर्वी झालेल्या शिवसेनेतील फुटी नंतर आज दोन स्वतंत्र दसरा मेळावे मुंबई येथे होत आहेत. याकडे देशाचे लक्ष लागले आहे मंगळवेढा तालुक्यात शिवसेनेचा आमदार नसला तरी तालुक्यातील मंगळवेढा शहर, मरवडे,भोसे, चिकलगी,घरनिकी,गुंजेगाव मारापुर,बोराळे या भागातील शिवसैनिक स्वखर्चाने मुंबईला गेले आहेत. जाताना जेवणापासून उपासमार होऊ नये म्हणून बाजरीच्या भाकरी व ठेचा घेऊन गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

Taurus Horoscope 2026 : घर-जमीन खरेदीसाठी अनुकूल काळ, शनीच्या कृपेने वृषभ राशीला लाभाचा मार्ग, पण..; या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष?

SCROLL FOR NEXT