उपसा सिंचन योजना Sakal
सोलापूर

मंगळवेढा उपसा सिंचन योजना रखडली

आमदार भारत भालके यांच्या निधनापूर्वीचा पाणी प्रश्न; सर्वच राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : (स्व.) आमदार भारत भालके यांच्या अकरा वर्षाच्या आमदारकीच्या काळात मैलाचा दगड ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजना राजकीय व्यासपीठावर तरंगत असून त्यांच्या अकाली निधनामुळे या योजनेच्या पूर्णत्वाला खिळ बसली आहे. योजनेच्या पूर्णत्वासाठी वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनाकडे अनेक मान्यवरांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे या योजनेची वाटचाल संथ गतीने सुरू आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्भवलेल्या ३५ गावच्या पाणीप्रश्‍नासाठी (स्व.) भालके यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करीत या योजनेतील अडचणी पार करत योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. या तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या योजनेला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर काँग्रेसवासी होत आपले प्रयत्न सुरू ठेवले परंतु २०१४ च्या राज्यातील सत्ताबदलानंतर या योजनेतील पाणी आणि गावे कमी करण्याचा प्रयत्न केल्यावर या भागातील नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तत्कालीन सरकारला पाणी देण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले. २०१९ च्या अंतिम टप्प्यात पाणी आणि गावे कमी करून सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी निघाल्या. २०१९ मध्ये नाट्यमय घडामोडीने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदामंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन पाणी व गावे पूर्ववत ठेवले. दरम्यान, त्यांच्या अकाली निधनानंतर या योजनेचे काम थांबले असतानाच जलसंपदा मंत्र्यांनी मार्चमध्ये या योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार या योजनेचे पुन्हा सर्वेक्षण होऊन पाणी व गावे पूर्व ठेवण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच पारित झाला. या योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात असून आहे. परंतु (स्व.) आमदार भालके यांना श्रद्धांजली वाहताना अनेक राजकीय नेत्यांनी या भागातील दुष्काळी जनतेला पाणी मिळवून देणे, ही त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांची अपूर्ण काम मार्गी लावून लावली जाईल विकास आघाडी सरकार या भागातील जनतेच्या पाठीशी राहिल असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील सलगर बुद्रुक येथे बोलताना देखील या भागातील जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सध्या या योजनेचा प्रस्ताव सर्वेक्षण होऊन मंत्रालयात गेला असून अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही.

तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोटनिवडणुकीच्या दरम्यान मंगळवेढ्यात बोलताना तुम्ही भाजप उमेदवाराला आमदार करा, मी तुम्हाला केंद्रातून पाणी मिळवून देऊ असे सुतोवाच केले त्यानी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे हा प्रश्न सध्या राजकीय पातळीवर दुर्लक्ष झाल्यामुळे जनतेला प्रत्यक्षात पाण्याचा लाभ मिळून (स्व.) भालके यांचे अपूर्ण स्वप्न कधी पूर्ण होणार असा सवाल या भागातील नागरिकांतून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT