Ganpati Mandir Sakal
सोलापूर

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणपती मंदिराची पुरातत्व विभागाकडून तोडफोड

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : देशभरात सध्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असताना एकीकडे पुरातत्व विभागाकडून मंदिरातील फरशीची तोडफोड केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील पुरातन गणेश मंदिरात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या तोडफोडीनंतर ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

(Solapur Latest News Updates)

या घटनेनंतर ग्रामस्थांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाकडे असून अनेक वेळा तक्रारी करूनही पुरातत्व विभाकाकडून याकडे लक्ष देण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तर ऐन गणेशोत्सवात ही कारवाई केल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या मंदिरातील फरशी कामावर पुरातत्व विभागाने आक्षेप घेत बुधवारी तोडफोड केली. त्यानंतर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गणेश चतुर्थीदिवशीच पुरातत्व विभागाने मंदिराच्या कामाची तोडफोड केल्यामुळे आमच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहोत." अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

Supreme Court Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी! 'कोर्ट मास्टर' पदासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

SCROLL FOR NEXT