मोहोळ तालुक्यात सामाजिक उपक्रमाद्वारे शांततेत गणेश विसर्जन Canva
सोलापूर

मोहोळ तालुक्यात सामाजिक उपक्रमाद्वारे शांततेत गणेश विसर्जन

खबरदारीचा उपाय म्हणून मोहोळ पोलिसांनी विसर्जनाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापुर) : मोहोळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गणेश विसर्जन विविध सामाजिक उपक्रम राबवून शांततेत पार पडले, ना हलग्या ना डॉल्बीचा दणदणाट. गणेश विसर्जन असूनही शहरातील रस्ते सुनसान दिसत होते. खबरदारीचा उपाय म्हणून मोहोळ पोलिसांनी विसर्जनाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

शहरासह ग्रामीण भागात विविध मंडळाच्या माध्यमातून लहान मोठया अशा 219 गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते, नागरिकांनी तसेच गणेश मंडळाने ही त्याचे तंतोतंत पालन केले. नगरपरिषद प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेच्या बालो द्यानातील हौदात विसर्जनाची सोय केली होती. दिवसभरात हौदात लहान-मोठ्या मिळुन दोनशे गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी 6 अधिकारी 45 पोलिस कर्मचारी व 35 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात केले होते. प्रत्येक गावात एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड देण्यात आला होता. बीट निहाय तसेच गुन्हे अन्वेषण विभागाने मोहोळ ते पाकणी, मोहोळ ते शेटफळ, मोहोळ ते लांबोटी अशा स्वरूपाच्या गस्तीचे आयोजन केले होते. गणेश विसर्जन करताना अप्रिय घटना घडू नये म्हणून लांबोटी येथील सीना नदी वरील जुन्या व नव्या पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोहोळ शहरात शिवाजी चौक, कन्या चौक, गवत्या मारूती चौक, या ठिकाणी हि चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अनावश्यक खर्चाला फाटा देत गणेश विसर्जन

दरम्यान पापरी ता मोहोळ येथील भोसले उद्योग समुहाच्या गणेश मंडळाने विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत, गावानजीक असलेल्या ओढ्याची साफसफाई केली. खंडाळी ते पापरी या रस्त्यावर चिलारी च्या झाडाचे साम्राज्य होते. त्या ठिकाणी वळण असल्याने सारखे किरकोळ अपघात होत होते, तसेच पाणी साठत असल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी येत होती. त्यामुळे भोसले उद्योग समूहाच्या गणेश मंडळातील गणेश लोंढे, सचिन भोसले, सचिन थिटे, निवास भोसले ,शरद खंडाळकर, अनिल शहा, विशाल पाटील, नंदकुमार लोखंडे, समाधान सावंत या कार्यकर्त्यांनी सुमारे पाच तास जेसीबी चालवून ओढा स्वच्छ केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT