आज आषाढी यात्रे निमित्त प्रबोधन दिंडीचे आयोजन sakal
सोलापूर

Solapur : मोहोळ मधील लोटस् स्कुलच्या बालवारकऱ्यांचा रिंगण सोहळा

दिंडी सोहळ्या निमित्त शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळी काढलेली होती

राजकुमार शहा

मोहोळ : लोटस स्कूल, मोहोळ च्या वतीने आज आषाढी यात्रे निमित्त प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीचा प्रारंभ शाळेच्या प्रांगणामध्ये विठ्ठलाच्या पूजनाने व रिंगण सोहळ्याने झाला. श्रीमती लिलाबाई वसंतराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय कुलकर्णी व माधुरी कुलकर्णी यांनी शाळेस पितळेचे तुळशी वृंदावन भेट दिले.

दिंडी सोहळ्या निमित्त शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळी काढलेली होती. संस्थेच्या संचालिका विजया देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना वारीचा इतिहास सांगून मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यर्थ्यांनी विठू नामाचा जयघोष करीत शाळेपासून बुधवार पेठ, शिवाजी चौक, नगरपरिषद कार्यालय, तहसिल कचेरी, आदर्श चौक या मार्गाने पायी चालत दिंडी काढली. त्यावेळी पद्मावती भजनी मंडळाच्या अलकनंदा कुलकर्णी, भारती देशपांडे, मोहिनी देशपांडे यांनी भजन गायन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

दिंडी आदर्श चौक येथे आल्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून "बेटी बचाओ बेटी बढाओ" चा संदेश दिला. हे पथनाट्य यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षिका कुमुदिनी नवले, ललित पाटील, उर्मिला शिरसट, गंगा नाईक यांनी परिश्रम घेतले. या दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व अनेक पालक सहभागी झाले होते.

या दिंडीचे कौतूक शहर वासीयांनी केले.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थचे अध्यक्ष डॉ. जयंत गोळवलकर, उपाध्यक्ष प्रा. नंदकिशोर देशपांडे, सचिव अॅड. अमोल देशपांडे, मुख्याध्यापिका केतकी अमोल देशपांडे व उप मुख्याध्यापिका नम्रता अमित कुलकर्णी व इतर सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT