सिध्देश्‍वर साखर कारखाना sakal media
सोलापूर

Solapur : चिमणी कारवाईबाबत महापालिका संभ्रमात

सिध्देश्‍वर कारखान्याला नोटीस देण्यात दिरंगाई

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सिध्देश्‍वर साखर कारखान्याला चिमणी पाडकामाबाबत महापालिका संभ्रमात असल्याने पाडकामाच्या पूर्व तयारीला दिरंगाई होत आहे. बॉयलर बंद करण्यासंबंधीच्या नोटिसीवर विधी विभागाचा सल्ला घेऊन कारखान्याला पत्र देण्यास महापालिकेला तीन दिवसांचा कालावधी लागला. कारखान्याच्या नोटीसमध्ये नमूद केलेला चोवीस तासाचा कालावधीही वगळण्यात आला आहे.

सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या को-जनरेशन चिमणीला न्यायालयीन अंतर्गत कामकाजासाठी १० डिसेंबरपर्यंतची मुदत मिळली आहे. उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या मुदतीच्या आदेशामध्ये चिमणीचे पाडकाम करू नये, परंतु त्याची पूर्व तयारी करण्याला कोणतीच अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे १० डिसेंबरनंतर कारखान्याची चिमणी पाडकाम हाती घेण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारी सुरू केली. प्रारंभी कारखान्याचा बॉयलर २४ तासात बंद करण्याची कारखान्याला नोटीस काढली होती. हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने कोणतेही आक्षेप येऊ नये, यासाठी हे नोटीस पुन्हा विधी अभिप्रायासाठी संबंधित विभागाला पाठविण्यात आला. विधी अभिप्राय घेऊन पुन्हा नव्याने काढलेल्या नोटिसीत २४ तासांचा कालावधी वगळत बॉयलर त्वरित बंद करा, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नोटीस काढून दोन दिवसाच्या प्रक्रियेनंतरदेखील कारखान्याला अद्याप नोटीस दिली गेली नाही. या दिरंगाईच्या कामकाजावरून चिमणी पाडकामाबाबत महापालिका प्रशासन संभ्रमात असल्याचे स्पष्ट होते.

लेखी पत्र देण्याची बैठकीत सूचना

महापालिका आयुक्‍तांनी महावितरण विभाग, प्रदूषण नियमक महामंडळ, बॉयलर विभाग आणि साखर आयुक्‍त अधिकारी यांची संयुक्‍त बैठक घेतली. या बैठकीत कारवाईच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून सुरू असलेली पूर्व तयारीची माहिती घेतली. यावर साखर आयुक्‍त कार्यालयाने आमचा टेक्‍निकल विभागाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तर आयुक्‍तांनी महावितरण, प्रदूषण नियमक महामंडळ, बाष्पके विभागाकडून कारवाईच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत महापालिकेला लेखी कळविण्याची सूचना या बैठकीत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT