सोलापूर

सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेचा मुहुर्त निश्चित

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा यंदा दोन दिवस होणार आहे. 30 मार्च रोजी सर्वसाधारण अंदाजपत्रक होणार असून, 31 मार्च रोजी परिवहन आणि शिक्षण मंडळासाठी स्वतंत्र सभा बोलावण्यात येणार आहे. 

महापालिका प्रशासनाने यापूर्वीच अंदाजपत्रक सादर केले असून, त्यावर सध्या सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आढावा घेत आहेत. 21 मार्चपासून अंदाजपत्रकाबाबत भाजपच्या सर्व नगरसेवकांची आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर अंदाजपत्रकीय सभेत चर्चा होणार आहे. पाणीपट्टीसह कोणत्याही करामध्ये वाढीची शिफारस नसलेले 2020-21 साठीचे 704 कोटी 21 लाख 97 हजार 410 रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. 

अंदाजपत्रकात महसुली विभागातून 516 कोटी 32 लाख 21 हजार 401 रुपये, तर भांडवली विभागातून 187 कोटी 89 लाख 76 हजार रुपये असे एकूण 704 कोटी 21 कोटी 97 लाख 401 रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. महसुली विभागातून 438 कोटी 73 लाख रुपये, पाणीपुरवठा विभागाकडून 77 लाख 55 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. महसुली विभागाच्या खर्चात 412 कोटी 53 लाख रुपये आणि पाणीपुरवठा विभागावरील खर्च 77 कोटी 55 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. भांडवली विभागातून 47 कोटी 45 लाख रुपयांची भांडवली कामे करण्यात येणार आहेत. तर अनुदानातून 140 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. 


महापालिकेस असे मिळेल उत्पन्न 
महापालिका कर (97 कोटी 28 लाख), निश्‍चित महसुली उत्पन्न (नऊ कोटी 10 लाख), महापालिका मालमत्तेपासून उत्पन्न (12 कोटी 70 लाख), शुल्क आणि वापरकर्ता शुल्क (99 कोटी 79 लाख), विक्री आणि भाडे (एक कोटी दोन लाख), महसुली अनुदान (218 कोटी 62 लाख), गुंतवणुकीतून उत्पन्न (10 लाख), दिलेल्या कर्जावरील व्याज (पाच लाख), इतर उत्पन्न (सात लाख), पाणीपुरवठा उत्पन्न (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये). 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT