सोलापूर

नाशिकच्या धर्तीवर महापालिका सभेची मागणी

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : शहरासंदर्भातील प्रश्न प्रलंबित राहू नयेत यासाठी नाशिक महापालिकेने व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर सोलापूर महापालिकेचीही सभा घ्यावी, अशी मागणी नगरसेवकांतून होत आहे. 

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची मे महिन्याची सभा रद्द करण्यात आली. तसे पत्र महापौरांनी सर्व नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना पाठविले. पत्र पाठवून सभा रद्द करण्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दर महिन्याला एक सभा घ्यावीच लागते. सभा घ्यायची नसली तरी सभागृहात येऊन महापौरांनी सभा तहकूब करणे आवश्‍यक आहे. कोणत्याही स्थितीत सभा रद्द करता येत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. एप्रिल महिन्यातील सभाही रद्द करण्याचा निर्णय झाला होता. नगरसेवकांना पत्राद्वारे कळवून सभा रद्द झाल्याचे कळविण्यात येणार होते. मात्र अधिनियमातील तरतूद दाखवत सभागृहात सभा रद्द करावी लागेल असे सांगण्यात आले, परिणामी दोन-चार नगरसेवकांच्या उपस्थितीत सभा रद्द करण्यात आली. 

मे महिन्याची सभाही 20 तारखेला काढण्यात आली. वेळही निश्‍चित झाली. दरम्यान सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. त्यामुळे सभा घ्यावी की नाही याबाबत महापौर श्रीकांचना यन्नम व सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी आयुक्तांकडे अभिप्राय मागितला. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनातील तरतुदीनुसार सभा घेता येणार नाही, ती रद्द करावी, असे पत्र आयुक्तांनी महापौरांना दिले. त्यानुसार मे महिन्यातील महापालिकेची सभा रद्द करण्यात आली. 

दरम्यान, लॉकडाऊनमुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. नगरसेवकांची सभा होत नसल्याने शहरातील समस्यांबाबत किंवा इतर प्रश्‍नांबाबत काहीच चर्चा करता येत नाही. त्यामुळे महापालिकेची दरमहाची सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याची व्यवस्था करावी. तसेच
 सभेची विषयपत्रिका नगरसेवकांना व्हॉटसऍप, ई मेल किंवा कोणत्याही डिजीटल माध्यमातून पोचविण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी राष्ट्रवादी कॅांग्रेसचे गटनेते किसन जाधव यांनी आयुक्तांकडे केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, आता मात्र सर्वच पक्षातील नगरसेवकांनी डिजीटल सभेची मागणी सुरु केली असून, त्याबाबत प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे मार्चपासूनच्या सभा झाल्या नाहीत. त्यामध्ये अंदाजपत्रकीय सभेचाही समावेश आहे. सभा न झाल्यामुळे सध्या प्रशासनाने पाठविलेल्या अंदाजपत्रकानुसारच कामकाज सुरु आहे. अंदाजपत्रकीय सभा कधी होईल याबबत याबाबत कोणतीही श्‍वाश्‍वती नाही. ही सभा होईपर्यंत आयुक्तांच्या अंदाजपत्रकानुसारच कामकाज होणार आहे. अंदाजपत्रकीय सभा घेता आली नाही तरी, किमान दर महिन्याची सभा तरी डिजीटलद्वारे घ्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. 

महापालिकेचे कामकाज चालले पाहिजे. यासाठी व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे सभा आयोजिण्याबाबत आयुक्तांशी बोलणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील विषयपत्रिकेवरील महत्त्वाचे विषयांवर तरी निर्णय घेण्यासाठी डिजीटल सभा बोलवावी, असे आयुक्तांना सांगणार आहे.
- श्रीनिवास करली, सभागृह नेता, सोलापूर महापालिका
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT