सोलापूर

ऑनलाईन कर भरा ; सहा टक्के सवलत मिळवा 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापालिकेने 2020-21 या आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले वाटण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षाचे बिल थेट भरल्यास पाच टक्के तर ऑनलाईन भरल्यास सहा टक्के सवलत मिळणार आहे. 31 जुलै 2020 पर्यंत ही सवलत असणार आहे. थकबाकी असलेल्या मिळकतदारांना ही सवलत मिळणार मिळणार नाही. कोरोना महामारीमुळे मिळकत कराची बिले ही घरी पोचवली जाणार नाहीत. तर कराची माहिती ही मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. 

डिजिटल पेमेंटने मिळकतकर भरल्यास सहा टक्के सवलत दिली जाणार आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर सुविधा करण्यात आली आहे. बिले न मिळाल्यास महापालिकेच्या याच संकेतस्थळावरून आपल्या मिळकतीचा क्रमांक टाकून बिले डाऊनलोड करून घ्यावीत. मिळकतकराच्या बिलावर क्‍यु आर कोडचीही सुविधा असल्याने ऍप्सच्या मदतीने जागेवर बसून कर भरता येणार आहे. या शिवाय डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस, एनईएफटीनेही भरणा केल्यास सहा टक्‍क्‍यांची सवलत मिळणार आहे. डिजिटल पेमेंटशिवाय कर भरणाऱ्यांना मात्र पाच टक्के सवलत मिळेल. 

एच.एस.आर. पाण्याची टाकी-डी मार्टजवळ, मजरेवाडी कर संकलन कार्यालय, बाळे कर संकलन कार्यालय, आर.सी.एच. शेळगी दवाखाना, विभागीय कार्यालय क्रमांक पाच, अक्कलकोट रस्ता एमआयडीसी कर संकलन कार्यालय आणि महापालिकेतील नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी कर भरण्याची सोय आहे. थकीत मिळकत करावर एक एप्रिल 2020 पासून आणि चालू बिलाची थकबाकी राहिल्यास 1 ऑगस्टपासून महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दोन टक्के दंड लागणार आहे. खुल्या जागा असलेल्या मिळकतदारांनी त्यांच्या मिळकत कराची बिले संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावीत किंवा महापालिकेतील कार्यालयात संपर्क साधून उपलब्ध करून घ्यावीत. 

मोबाईल टॉवरची वसुली 
शहरात जीओ कंपनीने उभारलेल्या मोबाईल टॉवरच्या थकबाकीपोटी 1 कोटी 36 लाख रुपये तसेच पोलिस आयुक्त कार्यालयाकडे असलेली 21 लाख 70 हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. 13 मे पासून ऑनलाईन कर भरण्याची सुविधा केल्यामुळे शहराबाहेर वास्तव्यास असलेल्या तसेच शहरातील मिळकतदारांनी ऑनलाईन कर भरण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती कर संकलन प्रमुख प्रदीप थडसरे यांनी दिली. 


सध्याच्या नियोजनानुसार बिल मिळो अथवा न मिळो रोख किंवा ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास प्रस्तावानुसार 31 जुलैपर्यंत पाच किंवा सहा टक्के सवलत मिळेल. थकबाकीदारांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. 
- प्रदीप थडसरे, कर आकारणी व कर संकलन प्रमुख 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT