पेट्रोलपंप sakal
सोलापूर

Solapur : चार महिन्यात सातरस्त्याला महापालिकेचा पेट्रोलपंप

इंडियन ऑइल कंपनीचे असणार सेटअप

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर  : सोलापुरातील अत्यंत रहदारीच्या सातरस्ता येथे महापालिकेच्यावतीने मॉडेल पेट्रोलपंप उभारण्यात येत असून त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विभागाच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दरम्यान येत्या चार महिन्यांमध्ये इंडियन ऑइल कंपनी लिमिटेड यांच्यावतीने पेट्रोलपंपाचा सेटअप उभारण्यात येणार आहे. या पेट्रोल पंपातच सीएनजीचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळाली.

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शहरात सात रस्ता आणि हैदराबाद नाका या दोन ठिकाणी महापालिकेच्या जागेवर पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वी घेतला आहे. यासाठी ता.१७ मार्च रोजी सात रस्ता व हैदराबाद नाका येथील जागेची पाहणी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली होती.

शहरातील सात रस्ता येथील महापालिका परिवहन उपक्रम बस डेपो येथील जागेवर आणि हैदराबाद रस्ता या ठिकाणी मॉडेल पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रशासनाने विकास आराखडा तयार केला. त्यावर पेट्रोलपंप उभारणीसाठी संबंधित विभागाकडील आवश्यक असलेल्या सर्व परवानगी प्रक्रिया मागील दोन महिन्यात पूर्ण झाल्या आहेत.

या दोन्ही ठिकाणी इंडियन ऑइल कंपनी लिमिटेड यांच्याकडून पेट्रोलपंपांची उभारणी होणार आहे. या पंपाच्या उभारणीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. सात रस्ता येथे पेट्रोलपंप उभारणीला आता गती आली आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यात येथील पेट्रोलपंपाचे काम पूर्ण होईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर हैदराबाद नाका येथे देखील महापालिकेच्या जागेवर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठीचे काम सुरू आहे. अद्याप परवानगी प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत. हैदराबाद नाका येथील पेट्रोलपंपाला विलंब लागणार आहे. तत्पूर्वी सात रस्ता येथील मॉडेल पेट्रोलपंप काही महिन्यात सेवेत येणार आहेत.

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासन करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, शहरात दोन पेट्रोल पंप उभारण्यात येत आहे. हे पेट्रोलपंप एक मॉडेल पेट्रोलपंप असणार आहे. अगदी मध्यरात्री एखादी महिला या पेट्रोल पंपावर आली तरी तिला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर सीएनजी पंपासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सात रस्ता पेट्रोलपंप उभारणीसाठी परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

‘आयओसीएल’ या कंपनीकडून त्याच्या उभारणीसाठी किमान तीन महिने लागतात. त्यामुळे कालावधी निश्चित सांगता येणार नाही. महापालिकेकडून हे पेट्रोल पंप चालविण्यात येणार आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात निश्चित भर पडणार आहे.

- शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT