सोलापूर

`या` महापालिका अग्निशमन दलाने  दिले 683 मुक्‍या जिवांना जीवदान 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापालिका अग्निशमन दलाने गेल्या 15 वर्षांत तब्बल 683 प्राणी-पक्ष्यांना जीवदान दिले आहे. पतंगाच्या मांजामुळे अडकलेल्या शेकडो पक्ष्यांची सुटका केली आहे. ही कार्यवाही करताना मनुष्याचाच जीव धोक्‍यात आला आहे, या भावनेने धाडसी कृती केली जाते. 

आग विझविणे हे अग्निशमन दलाचे मुख्य काम असले, तरी मालमत्ता वाचविणे आणि जीवितहानी होणार नाही यासाठी दलाचे जवान कार्यरत असतात. केवळ माणसांचेच नव्हे, तर शेकडो प्राणी- पक्ष्यांचे जीव वाचवून दलाने कर्तव्य पार पाडले आहे. आपत्कालीन स्थितीत घरांत अडकलेल्या लोकांची सुटका करणे, विजेच्या खांबावरील वायरच्या जंजाळात तसेच झाडावर अडकलेल्या पक्ष्यांची सुटकाही करण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करतात. 

वाढत्या शहरीकरणाने भांबावून दुर्घटनाग्रस्त झालेल्या शेकडो प्राणी-पक्ष्यांना गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले आहे. त्यांना सुखरूप निसर्गात नेऊन सोडले आहे. वास्तविक पाहता, प्राणी आणि पक्ष्यांची सुटका करणे ही जबाबदारी अग्निशमन दलाची नाही; परंतु सामाजिक भान ठेवत नागरिक आणि पर्यावरण मित्रांच्या विनंतीनुसार दल हेही काम करत असते. कावळा, घार, मांजर, विविध प्रकारचे पक्षी, गाय यांचा समावेश आहे. उंचावर अडकलेले, पतंगाच्या मांजात पाय गुंतलेले, जखमी, विजेच्या तारेत, झाडाच्या फांदीत, घराच्या तावदानात अशा स्वरूपात हे पक्षी अडकलेले आढळले होते. 

अग्निशमन दलाने वाचविलेले पक्षी-प्राणी 
2006 (46), 2007(52), 2008 (54), 2009 (42), 2010 (48), 2011 (63),2012(37), 2013 (48), 2014 (46), 2015 (24), 2016 (42 ), 2017 (79), 2018 (45) व 2019 (57) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT