solapur sakal
सोलापूर

Solapur : सोलापुरात आ.धंगेकरांचा सत्कार, मात्र चर्चा राष्ट्रवादी- शेकाप फायद्याची आणि काँग्रेसच्या गटबाजीची

शरद पवार सांगोल्यातील कार्यक्रमात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उर्जित अवस्था निर्माण झाली,लोणारी समाजातर्फे कसबा पेठेतून निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला - सांगोला येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते नूतन आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्काराचा कार्यक्रम लोणारी समाजातर्फे संपन्न झाला. कार्यक्रमाचे निमित्त जरी सत्काराचे असले तरी चर्चा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप पक्षाच्या फायद्या - तोट्याची व काँग्रेसच्या गटबाजीची सुरू झाली आहे.

सांगोला येथे लोणारी समाजातर्फे कसबा पेठेतून निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

लोणारी समाजातर्फे हा सत्कार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच पाठबळ दिले होते आणि यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.

शरद पवार दोन दिवस सांगोल्यातील कार्यक्रमात आल्यामुळे सांगोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उर्जित अवस्था निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी शरद पवार यांचे दोन दिवस सारथ्य केले होते.

यादरम्यान शरद पवार यांनी जिल्ह्यातील अनेक राजकीय टिप्स माजी आमदार साळुंखे पाटील यांना दिल्या असतील. शरद पवार यांनी दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठीही आवर्जून उपस्थिती लावत पक्षातील आपल्या जुन्या-नव्या सवंगड्यांना एकत्रितच केल्याचे दिसून आले.

शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे गेल्या अनेक वर्षापासून अतूट नाते निर्माण झाले होते. परंतु गेल्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीपासून या दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांमध्ये दुरावाच निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सत्कार कार्यक्रमामुळे या पक्षातील दोन्ही नेते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एकत्रित आल्याचे दिसून आले.

याचवेळी व्यासपीठावर शरद पवार यांनी पुरोगामी युवकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांना जवळ बोलावून त्यांच्याशी केलेली जवळीक याची चर्चाही झाली. तसेच या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे कार्य सांगून अप्रत्यक्षपणे त्यावेळेचा काळ व सध्या परिस्थितीतील शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीकाच केली होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या कार्यक्रमानिमित्त महूद, सांगोल्यात आले. परंतु काँग्रेस पक्षाचे या झालेल्या कार्यक्रमातून त्यांची गटबाजी दिसून आली. आमदार शहाजी पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर सांगोल्यात काँग्रेसची झालेली वाताहत पाहता हळूहळू पक्षात ऊर्जीत अवस्था निर्माण होईल असे वाटत होते.

परंतु सध्या तालुक्यातील पक्षाच्या अस्तित्वापेक्षा गटबाजीच प्रकर्षाने जाणवते. प्रदेशाध्यक्ष समोरच ही गटबाजी सर्वसामान्यांना दिसून आली. युवक आणि प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी अजयसिंह इंगवले यांच्या मेडशिंगी येथील कार्यक्रमासाठी खुद्द शरद पवार गेले परंतु सांगोल्यात असूनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गैरहजर राहिल्याने याचीही चर्चा कार्यक्रमानंतर झाली.

लक्षवेधी -

  • शरद पवार दोन दिवस सांगोल्यातील कार्यक्रमात आल्याने कार्यकर्त्यांत मोठा उत्साह

  • माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी शरद पवार यांच्या गाडीचे केलेले सारथ्य व नंतरही पवार यांनी पुढील कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरमधून साळुंखे पाटलांना घेऊन गेल्याने दोघात नेमकी काय राजकीय चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क

  • काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पुढेच तालुक्यातील काँग्रेसची गटबाजी दिसून आली

  • तालुक्यातील काँग्रेसच्या अस्तित्वापेक्षा गटबाजीची खरी चर्चा झाली

  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वर्गीय देशमुखांच्या घरी जाऊन नातवाशी केली चर्चा

  • कार्यक्रमात नाना पटोले यांनी आमदार शहाजी पाटलांवर अप्रत्यक्ष केलेली टीका व त्यानंतर आमदार पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांवर केली तिखट टिप्पणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT