Solapur sakal
सोलापूर

Solapur : नवीन पक्षी नसल्याने संवर्धन कागदावरच

माळढोक प्रजननची स्थिती; चित्ता प्रकल्पाने आशा पल्लवीत

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील नान्नजच्या माळढोक अभयारण्यात अजूनही एकमेव शिल्लक असलेल्या माळढोक पक्ष्याच्या मादीसोबत दुसरा जोडीदार देण्याच्या प्रस्तावाबाबत सरकारदरबारी काहीही हालचाली झाल्या नाहीत. पण नुकतेच मध्य प्रदेशातील वनक्षेत्रात चित्त्यांना सोडण्याच्या बातमीमुळे माळढोकाच्या कृत्रिम प्रजनन प्रकल्पाबाबत आशेचे किरण दिसू लागले आहेत.

नान्नज अभयारण्यात माळढोक पक्ष्याची एकमेव मादी सध्या वास्तव्यास आहे. हे अभयारण्य माळढोक पक्ष्यांसाठी राखीव झाले आहे. या अभयारण्यात माळढोक पक्ष्यांची संख्या कशी वाढेल, या बाबत सातत्याने शासन पातळीवर विचार विनिमय सुरु आहे.

सुरवातीला राजस्थानमधून माळढोक पक्ष्यांची अंडी कृत्रिमरित्या उबवून पिल्ले नान्नजच्या अभयारण्यात आणावित असा विचार झाला. नंतर तो बारगळला. त्यानंतर काही महिन्यापूर्वी मानद वन्यजीव रक्षकांच्या बैठकीत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी माळढोक पक्षी राजस्थानमधून नान्नजमध्ये आणून सोडले जातील.

यामध्ये दोन नर व एक मादी आणली जाईल, असे सांगितले गेले. मात्र, प्रत्यक्षात अजून तरी या प्रस्तावाबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. देशातून नामशेष झालेला चित्ता पुन्हा भारतात यावा यासाठी मध्यप्रदेशात नुकतेच काही चित्ते स्थलांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधानाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याने आता निसर्गप्रेमींचे लक्ष पुन्हा एकदा नान्नज अभयारण्याकडे लागले आहे. विशेष म्हणजे माळढोक पक्ष्यांचे आयुष्यमान हे १२ वर्षे असते. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या माळढोक पक्ष्याच्या मादीचे आयुष्य लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.

सध्या तरी इतर भागातील माळढोक पक्षी नान्नजच्या अभयारण्यात आणून सोडेपर्यंत माळढोक संवर्धनाच्या योजनेला मोठा खोडाच बसल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT