solapur  sakal
सोलापूर

Solapur News : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग

मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतले असल्याचेही सांगण्यात येत आहे.

आण्णा काळे

करमाळा - करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून दोन दिवसात 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती वरती बाजार समितीच्या स्थापनेपासून जगताप गटाचे वर्चस्व राहिले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सभापती शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी केल्याने जगताप गटाची सत्ता गेली होती. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची मागील पंचवार्षिक निवडणूक राज्यभर गाजली होती. या पंचवार्षिक निवडणुकीत

पुन्हा एकदा जगताप गटाची सत्ता येण्यासाठी सर्व गटाच्या नेतेमंडळींनी समंजस्याची भूमिका घेण्याचा घेण्याच्या मार्गावर असल्याची सध्या तालुक्यात चर्चा असून त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये आमदार रणजितसिंहमोहिते पाटील यांनी पुढाकार घेतले असल्याचेही सांगण्यात येत आहे. माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील , बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी मोहिते पाटील प्रयत्न करत असल्याचे समजले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये सर्व उमेदवार आमदार संजय शिंदे गटाचे आहेत. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सध्या वेगाने सुरू आहेत. आमदार संजय शिंदे गटाच्या उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले आहे.त्याप्रमाणे बुधवार व गुरुवार या दोन दिवसात 12 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत .उर्वरित शिंदे गटाचे उमेदवारी अर्ज ही मागे घेतले जाणार आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेतलेली नावे पुढीलप्रमाणे

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ : - १) सतीश शेळके (सावडी ) , २ ) सुजीत बागल (मांगी ) , ३ ) दत्तात्रय बदे (उमरड ) ; ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ :

४) विलास पाटील ( लव्हे ) , ५) किरण फुंदे ( लिंबेवाडी ) , ६ ) दत्तात्रय बदे ( उमरड ) , ७) चंद्रकात सरडे ( चिखलठाण ) , ८ ) आजिनाथ विघ्ने ( केत्तूर ) , ९) अमोल दुरंदे (राजुरी ) , १० ) निलेश एकाड (सावडी) ; ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघ : ११) आशीष गायकवाड ( देवळाली ) , १२) आदिनाथ मोरे ( रोशेवाडी )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT