solapur matka  sakal
सोलापूर

Solapur News : मटका रे झटका मलई पाण्यावरची अन्‌ वाताहत सोलापूरची

मटक्याचा धंदा: पाण्यावर मलई, भरमसाट काळा पैसा! सोलापुरात मटका किंग गब्बरगंड; ‘मालक’ माजी आमदार भाच्यासह ‘प्रसाद’ वाटणाऱ्या कैकजणांना ‘आकाश’ ठेंगणे .

सकाळ वृत्तसेवा

भाग-२

शिवाजी भोसले

सोलापूर, ता. : मटक्याचा धंदा म्हणजे पाण्यावर मलई काढण्याचा धंदा. बीन भांडवलात किंवा कमी भांडवलात मटका किंग बनता येते. या काळ्या पैशातून भरपूर दानधर्म व देणग्या देऊन ‘धर्मात्मा’ बनता येते. हे सगळं हेरून पोलिस आयुक्तालय हद्दीमधील सातही पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत भागात मटका किंगनी अलीकडील काळात चांगले पाय रोवलेत. ‘मालक’ माजी आमदार भाच्यासह ‘प्रसाद’ वाटणाऱ्या कैकजणांना या धंद्यात जणू ‘आकाश’ ठेंगणं झाले आहे.

विशेषत्वे, त्या-त्या भागातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना व पोलिसांना हाताळण्याची कुशलता अंगी बाळगून मटक्याचं नेटवर्क सुरक्षीत ठेवत ‘जगा आणि जगू द्या’ या दोन नंबर धंद्यातील तत्त्वानं सोलापुरातील सर्वच भागातील मटका किंग अक्षरश: गबरगंड झाले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमधील विजापूर नाका आणि सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘मालक’

माजी आमदाराच्या भाच्याने तसेच कधी काळचा चित्रपट अभिनेता व माजी खासदारांचा कट्टर समर्थक कार्यकर्त्याने खाकीवर्दी आणि इतरांना ‘प्रसाद’ देत मटक्याचा तगडा धंदा सुरु ठेवला आहे. काळ्या पैशाच्या कमाईतून ‘प्रसाद’ वाटपाचा ’लोंढा’ दूरपर्यंत घालविणाऱ्या यंग बिग्रेड मटका किंगने राजकारणी नेत्यांच्या आशीवार्दाने मटक्याच्या धंद्याला संरक्षण मिळवलं आहे. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोघा यंग बिग्रेड दोस्तानी ‘ही दोस्ती तुटायची न्हाय’ असा नारा देत मटक्याच्या धंद्यात चांगलीच हवा निर्माण केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी एका माजी आमदाराच्या वाढदिवसाचे विधानसभेच्या दक्षिण मतदारसंघात म्हणजेच गांधी नाक्यापासून ते संपूर्ण जुळे सोलापुरात जे फलक झळकले त्यावर या मटका किंगच्या छबी झळकल्या होत्या. भल्या मोठ्या फलकांना मटक्यामधील ‘माया’चा टेकू लागला. ‘स्वाभिमानी’च्या स्वर्गीय सुभाष पाटील यांचा कार्यकर्ता म्हणून फिरलेल्या ‘घोरपड’बाई तुझीच पाठ मऊ’ असं खार्कीवर्दीच्याबाबीत समजावं लागतं. दोन नंबर चालायचे असेल तर ‘माया’ ओतावीच लागते याचा साक्षात्कार झालेल्या

आणि नावात ‘नर’ असलेल्या मटका किंग तरुणानं या पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका किंगचं आपलं प्रबळ केलं आहे. मटक्याच्या धंद्यामधील काळ्या पैशावर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दामटीत वसूलदारांचे हात ओले करण्यासाठी गाडीची काळी काच या तरुणाकडून बऱ्याचदा अज्ञात स्थळी वर-खाली होत असते. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत साधारण ३३६ पेक्षा अधिक टपऱ्यांमधून मुंबई-कल्याणची तेजी असते.

‘दोन नंबर इनकी पेहचान’ याप्रमाणं मुळातच दोन नंबर धंद्याशी पूर्वीपासून नाव जोडले गेलेल्या आणि गँगस्टार या ओळखीबरोबरच गुंडा-गर्दीची दहशत राहिलेल्या शिवाय समाजात चांगची ‘अस्मिता’ दाखविण्याचा त्याचबरोबर जराशा त्याच नावाने नवीपेठच्या प्रवेशद्वाराजवळ रेस्टॉरंट अन्‌ बार असलेल्या मालक ‘भाऊ’

कंपनीचा फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीत मटका धंद्यात रुबाब आहे. ज्या भाऊ कंपनीवर यापूर्वी जुगार अड्डे, वेशा व्यावसाय चालविल्याबद्दलचे असे कित्येक गुन्हे दाखल आहेत. मोठा विस्तार असलेल्या या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ४०० हून जादा टपऱ्यांमधून मटका धंदा तेजीत चालतो असा बोलबाला आहे.

मटका किंग सुनील कामाठी यांच्या मटक्याच्या मोठ्या विस्ताराच्या जाळ्यामुळं प्रकाशझोतात आलेल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अद्यापही मटका किंग सुनील कामाठी यांच्या नावाचा बोलबाला आहे. मटक्याच्या क्षेत्रातील नाव, राजकीय वलय आणि ‘खाकी’ वर्दीशी पहिल्यापासून अर्थसंबंध या त्रि:सूत्रीच्या आधारे या धंद्यात ‘आकाश’ ठेंगणे झालेल्याने

या परिसरात सुनील कामाठी यांचं मटक्याचं साम्राज्य ‘जैसे थे’ ठेवले आहे. चुलत्याच्या धंद्याला पुतण्याचा लळा आहे याप्रमाणे येथे झाले आहे. सोलापुरात सर्वाधिक एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४८७ पेक्षा अधिक बुकी आहेत. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत

आडनावामध्ये ‘गुंड’ असलेल्या मटका किंगने खाकीवर्दी आणि खादीवर्दीला ‘बाबा.. बाबा...’ म्हणत आपला धंदा तेजीत ठेवला आहे. मटक्याच्या धंद्यामधील येथील उलाढालदेखील अक्षरश: चक्रावून सोडणारी आहे. काका प्रमाणं मटक्याच्या धंद्यात बक्कळ

‘माया’ कमविण्यासाठी जणू ‘आकाश’ ठेंगणे झालेल्या मटका किंगने जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतदेखील आपलं मटक्याचं साम्राज्य पसरवलं आहे.

हातगाड्यावरचा भाजी विक्रेता ते मटका किंग

विजयपूर रस्ता परिसरातील मटका किंग हा एकेकाळचा हातागाड्यावरुन भाजी विकणारा. व्यापार धंद्यातून पैसा मिळतो हे गणित त्याला पक्कं माहिती. पुढं स्वाभिमानीच्या ‘अण्णां’सोबत उठ-बस राहिल्याने या मटका किंगची ‘खाकी’वाल्यांशी ओळखी झालेल्या. याच ओळखीच्या आधारे त्याने आता या परिसरात मटक्याचे नेटवर्क उभा केले आहे. एक मामुली भाजी विक्रेता या भागाचा मटका किंग झाला आहे.

मटका किंगवाल्यांना नगरसेवकपदाची भुरळ

पाण्यावर मलई काढण्याच्या धंद्यातून गबरगंड झालेल्या मटका किंगवाल्यांना आता जणू आकाश ठेंगणे झाले आहे. मटक्यात पुढारपण करता करता त्यांना आता नेता बनून लोकांचे पुढारपण करायचे आहे. त्यातून वेगवेगळ्या निमित्ताने हे मटका किंग आपले फोटोंचे फ्लेक्स् झळकवत आहेत. मालक माजी आमदार भाचा, शिवजयंतीला मोठी मिरवणूक काढून स्वत:चे नाव मोठे करण्यासह सर्वांना मटक्याच्या मलईचा ‘प्रसाद’ वाटणारा मटका किंग अशीच ती काही नावे आहेत. ज्यांना आता महापालिकेच्या नगरसेवकपदाचे सिंहासन भूरळ घालीत असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT