solapur news  sakal
सोलापूर

Solapur News : जमीन खरेदी-विक्रीवरील निर्बंध उठले

राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये २० गुंठे (अर्धा एकर) जिरायती व १० गुंठे बागायती जमिनीची खरेदी-विक्री थेट करता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur : जिरायती व बागायती जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. आता सोलापूरसह राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये २० गुंठे (अर्धा एकर) जिरायती व १० गुंठे बागायती जमिनीची खरेदी-विक्री थेट करता येणार आहे.

नवीन आदेशानुसार तेवढ्या क्षेत्राच्या खरेदी-विक्रीसाठी कोणाच्याही स्वतंत्र परवानगीची गरज नाही. पण, त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी-विक्रीसाठी प्रातांधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

शेतकऱ्यांसह अन्य कोणत्याही खासगी व्यक्तीला १० गुंठे बागायती व २० गुंठे जिरायती जमिनीची खरेदी-विक्री थेटपणे करता येणार आहे. पण, हा नवा बदल महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका क्षेत्र व वगळून लागू असणार आहे. दरम्यान, या आदेशानुसार सोलापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधकांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडल्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार प्रमाणभूत क्षेत्रात अशंत: सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता २० गुंठे जिरायती व १० गुंठे बागायती जमिनीची खरेदी-विक्री थेटपणे करता येणार आहे. त्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

गोंविद गिते, मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर

घरकुल, विहीर व शेत रस्त्यासाठी निर्बंध शिथिल

बेघरांना गावात स्वत:ची जागा नाही, पण त्यांना शेतात घर बांधण्यासाठी अडचणी येत आहेत. तर जमिनी असलेल्या अनेकांच्या नातेवाइकांनाही तो प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे अशा लोकांना ५०० चौरस फूट जागेची खरेदी-विक्री करता येणार आहे.

दुसरीकडे शेती आहे, पण विहिरीसाठी दुसरीकडे जागा पाहिजे, अशा शेतकऱ्यांसमोरही अडचणीचा डोंगर उभा आहे. त्यांना दोन गुंठे आणि शेत आहे, पण रस्ता नाही अशा शेतकऱ्यांसाठी देखील रस्त्यासाठी काही प्रमाणात जमीन खरेदी-विक्री करता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याची कार्यवाही साधारणतः: १५ सप्टेंबरनंतर सुरु होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

SCROLL FOR NEXT