solapur news  sakal
सोलापूर

Solapur News : पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा,पांढरेवाडीतील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार

ग्रामसभेवेळी गावातून मोर्चा काढत अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली.

सकाळ वृत्तसेवा

solapur news - येथील महिलांनी गावामध्ये अवैधरीत्या चालू असणारा दारू व्यवसाय बंद करावा, यासाठी एल्गार पुकारला आहे. ग्रामसभेत रीतसर मागणी करूनही दारू विक्री चालूच राहिल्याने या महिलांनी करकंब पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांना लेखी निवेदन देत अवैध दारू विक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

प्रथम या महिलांनी सोमवारी (२८ ऑगस्ट) झालेल्या ग्रामसभेवेळी गावातून मोर्चा काढत अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी सरपंचांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पांढरेवाडी येथे अवैध दारू विक्री करणारी दोन दुकाने आहेत. त्या ठिकाणाहून होणाऱ्या दारू विक्रीमुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. शिवाय अनेक दारू पिणाऱ्या पतींचा त्यांच्या पत्नींना नाहक त्रास होत आहे.

यावेळी सरपंचांनी दारू विक्रेत्यांना समक्ष बोलावून सर्वांसमक्ष दारूची दुकाने बंद करण्याची विनंती केली. त्यानुसार विक्रेत्यांनी दारू विक्री बंद करण्याचे आश्वासन दिले. यावेळी झालेल्या ग्रामसभेत गावातील अवैध दारूची दुकाने बंद करण्याचा ठरावही पास करण्यात आला.

परंतु, त्यानंतरही त्यांनी दारू विक्री चालूच ठेवल्याने या सर्व महिलांनी पुन्हा एकत्रित येत करकंब पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांची पंढरपूर येथे भेट घेऊन त्यांच्याकडे अवैध दारू विक्री बंद करण्याची रीतसर लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यानंतरही पांढरेवाडी येथील अवैध दारू विक्री बंद झाली

नाही तर येथील सर्व महिला करकंब पोलिस ठाण्यासमोर उपोषण करतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर सुजाता वगरे, राणी माळी, कल्पना घाटे, छाया चिखलकर, द्रोपदी भोसले, मीना केचे, अनुराधा माळी, अर्चना सावंत, विठाबाई सुतार, फरजाना बागवान, पुष्पा देवकर, सीता कोरडे, ऐश्वर्या कोरडे, रेश्मा रंदवे, कौशल्या बनसोडे, उज्ज्वला सावंत, छाया चिखलकर, मीरा चिखलकर, राधा चिखलकर, सावित्रा चिखलकर, सुदामती आवटे, बंका वाळके आदी महिलांच्या सह्या आहेत.

अवैध दारू विक्री करणाऱ्या एक-दोन व्यावसायिकांना कदाचित चांगला मोबदला मिळतही असेल; परंतु त्यामुळे गावातील अनेक व्यसनाधीन लोकांच्या कुटुंबांचे वाटोळे होत आहे. शिवाय त्या कुटुंबातील महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावात दारूबंदी झालीच पाहिजे.

कल्पना घाटे, ग्रामस्थ, पांढरेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT