सोलापूर : महापालिका हद्दीत 49 जणांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1654 वर पोचली आहे. आतापर्यंत 12 जण बरे होऊन परत गेले आहेत. दरम्यान, सोलापुरात कोनाची बाधा होण्याचे पुरुषांचे प्रमाण स्त्रियांच्या दुप्पट आहे. आजअखेर 1002 पुरषांना, तर 652 महिलांना कोरोनाची बाधा झाली.
शहरातील शनिवार पेठ, होमकरनगर, भवानी पेठ, न्यू मार्केट यार्ड, जुने विडी घरकूल, कुमारस्वामीनगर शेळगी, पारसी विहीर भाग्योदय सोसायटी, शिवसेना कार्यालय विडी घरकूल शेटे नगर लक्ष्मी पेठ, घोंगडे वस्ती भवानी पेठ, मार्केट यार्ड, पश्चिम मंगळवार पेठ, कोटानगर जुना विडी घरकूल, जेल रोड तेलंगी पाच्छा पेठ, यामिनीनगर, नूतन प्रशालेजवळ, दक्षिण सदर बझार, जय भवानी प्रशाला, भवानी पेठ, हेरिटेज लॉन गांधीनगर, राघवेंद्र बाग झोपडपट्टी, तेलंगी पाच्छा पेठ, सरस्वतीनगर शेळगी, दक्षिण सदर बझार, गांधीनगर, वेणुगोपाळनगर कुमठा नाका, हेवन प्राईड शनिवार पेठ, सागर चौक विडी घरकूल हैदराबाद रस्ता, जांबवीर सोसायटी, मुस्लिम पाच्छा पेठ, यश नगर मुरारजी पेठ, वैदूवाडी भवानी पेठ, अरविंदधाम पोलिस लाईन, बुधवार पेठ, चंदननगर, विजयालक्ष्मीनगर, संगमेश्वरनगर, बुधवार पेठ जय मल्हार चौक या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर शहरात आज 227 अहवाल प्राप्त झाले यात 178 निगेटिव्ह,तर 49 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज 3 जण मृत्यू पावलेल आहेत .एकूण 12 जणांना बरं झाल्यानं आज घरी सोडण्यात आलं. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1654 इतकी झाली आहे तर मृतांची संख्या 139 आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.