Crime esakal
सोलापूर

Solapur : दोन दिवसांत पाच लाख द्या; गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

आम्हाला वेळेत पैसे नाहीतर दिले तर तुमचा जीव घ्यायला पण मागेपुढे पाहणार नाही. तुम्ही पोलिसांत जाऊन तक्रार दिली तर मला काहीच फरक पडणार नाही, असेही तो म्हणाला, असे फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर - ‘माझी मोठ्या लोकांसोबत ओळख आहे, मी पत्रकार आहे, मी तुमचे काहीपण करू शकतो’ अशी दमदाटी केली. दोन दिवसात पाच लाख रुपये द्या, नाहीतर अंबादासला मोठ्या गुन्ह्यात अडकवतो म्हणून धमकी दिल्याप्रकरणी प्रभाकर गायकवाड याच्याविरूद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, फिर्यादी यमुनाबाई मारुती गायकवाड (रा. सोळा संडासजवळ, लिमयेवाडी) यांची नात व खुशी अंबादास गायकवाड या दोघी साईबाबा चौकातून भाजीपाला घेऊन घराकडे येत होत्या. त्यावेळी संशयित आरोपी प्रभाकर गायकवाड याने त्या दोघींनी बळजबरीने अडवून खुशीचा हात धरला. त्यानंतर एकदा तुझ्या बापाला सांगितलेले समजत नाही का म्हणून दोन दिवसात पाच लाख रुपये द्यायला सांग, नाहीतर मोठ्या गुन्ह्यात अडवतो अशी धमकी त्याने दिली.

माझी मोठ्या लोकांबरोबर ओळख असून मी पत्रकार आहे. मी तुमचे काहीपण करू शकतो, रामू गायकवाड हा माझा मित्र असून तोही मोठा पत्रकार आहे. आम्ही दोघे मिळून तुम्हाला कामाला लावू, आम्हाला वेळेत पैसे नाहीतर दिले तर तुमचा जीव घ्यायला पण मागेपुढे पाहणार नाही. तुम्ही पोलिसांत जाऊन तक्रार दिली तर मला काहीच फरक पडणार नाही, असेही तो म्हणाला, असे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, रामू गायकवाड व प्रभाकर गायकवाड या दोघांविरुद्ध यापूर्वीचे सुद्धा पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. तरीसुद्धा त्याने असा प्रकार केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी संशयित आरोपी गायकवाडला पोलिसांनी अटक केली असून उद्या (रविवारी) न्यायालयात नेले जाणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT