solapur  sakal
सोलापूर

Solapur : पुरणपोळीसाठी हलका करावा लागणार खिसा

महागाईचा पोळा फुटलेलाच ,हरभरा, साखरेच्या दरात विक्रमी वाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पोळा आणि पुरणपोळी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळेच या सणाला पुरणपोळीची विशेष मागणी असते. पोळ्याला बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. मात्र, पुरणपोळीसाठी लागणाऱ्या हरभरा डाळ आणि साखरेच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. त्यामुळे पुरणपोळी महाग झाली आहे. यंदा पोळ्यावर महागाईचे ढग दाटले आहेत.

सणावारांच्या तोंडावर मागणी वाढल्याने हरभरा डाळीच्या दरात वाढ झाली आहे. पोळा आणि पुरण पोळी हे समीकरण घट्ट असल्याने घरोघरी पुरणपोळी करण्याची परंपरा आहे. ग्रामीण भागात पोळ्याला विशेष महत्त्व आहे. कारण पोळ्याला बैलाची पूजा करून पुरण पोळीचा नैवेद्य दाखविण्यात येते. परंतु, यंदा हरभरा डाळ प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी महागली आहे.

पंधरा दिवसापूर्वी ७० ते ७५ रुपये प्रति किलो असलेली हरभरा डाळ आता ८२ ते ९० रुपये किलो झाली आहे. परिणामी पुरणपोळी खवय्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

साखरेच्या दरात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात साखरेचे दर हे ४८ रुपये किलोपर्यंत गेले आहेत.

मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या साखर ३९ ते ४४ रुपये प्रति किलो आहे. ऑक्टोबर २०१७ नंतरचा हा सर्वोच्च दर आहे.

पोळ्याच्या तोंडावर पुरणपोळी महागली

याबाबत व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केलीय. कारण देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नंबर लागतो. या दोन्ही राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार आहे.

जूनमध्ये किरकोळ बाजारात साखरेचे दर हे ४२ रुपये किलो होते. तर जुलै आणि ऑगस्टमध्ये हे दर ४४ रुपयांवर गेले होते. तर आता सप्टेंबर महिन्यात साखरेचे दर हे ४८ रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली.

नवीन हरभऱ्याची आवक होण्यासाठी अजून नऊ महिन्यांचा कालावधी आहे. पोळ्याच्या निमित्ताने हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत. घाऊक बाजारात हरभरा डाळीच्या दरात क्विंटलमागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. भारत डाळ या ब्रँडची सुरुवात म्हणजे सरकारकडे असलेल्या साठ्यातील हरभऱ्याचे हरभरा डाळीत रुपांतर करून ग्राहकांना स्वस्त डाळ देण्यासाठी केंद्राने पाऊल उचलले आहे. मात्र, ती डाळ मिळाली नसल्याने वाढलेल्या किमतीत हरभरा डाळ खरेदी करावी लागत आहे.

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ व्यापारी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT