Solapur Drugs News Esakal
सोलापूर

Solapur Drugs News: आंतरराज्य टोळीच्या सूत्रधारासह दोघे अटकेत; ड्रगचे पाच राज्यात नेटवर्क

Solapur Police Crack Down on Narcotics : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे.

सकाळवृत्तसेवा

Solapur Police Crack Down on Narcotics: सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे. दोघांनाही २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मुख्य सूत्रधार फय्याज अहमद रसूल शेख (वय ५२, रा. बी २०, स्वीट सहारा अपार्टमेंट, राखेआळी रोड, जी. जी. कॉलेज रोड, वसई, जि. पालघर), रमेश नरसिंह आयथा (वय ४२, रा. गणेश नगर, बस स्टँड, मौलाअली, मलकजगिरी, हैदराबाद) अशी कोठडीतील संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत दिली.

१७ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिसांनी पुणे महामार्गावरील देवडी पाटी (ता. मोहोळ) येथील हॉटेल श्री साईसमोर दोघांना अटक करीत सहा कोटी दोन लाखांचा तीन किलो १० ग्रॅम ड्रग जप्त केला होता. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. संशयित हे चंद्रमौळी व चिंचोळी एमआयडीसीत ड्रग तयार करीत असल्याचे तपासात आढळून आले होते. त्यानुसार ते कारखाने पोलिसांनी सील केले होते.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार फय्याज हा कर्नाटकातील कलबुर्गी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथील लुंबिनी ग्रँड हॉटेल परिसरात सापळा रचून त्याला पकडले.

तपासात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने १६ फेब्रुवारी रोजी त्याचा साथीदार रमेश आयथा याला हैदराबादेतून ताब्यात घेतले. दोघांनाही विशेष न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, धनंजय पोरे, सूरज निंबाळकर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, विजयकुमार भरले, नाईक दीपाली जाधव आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे ठाकरे बंधुंनी काय केलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

Hardik Pandya : २० षटकार, ११ चौकार... हार्दिक पांड्याला आली लहर अन् करतोय कहर; १९ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक अन्...

Latest Maharashtra News Updates Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा; चंपा चौकात सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त

S26 येण्याआधीच Samsung चा मोठा धमाका! S25 Ultra मोबाईलवर थेट 58 हजारचा डिस्काउंट; खरेदीसाठी लागल्या रांगा, कुठे सुरुय ऑफर पाहा

लेकाशिवाय आयुष्य अपूर्ण, पण त्याचं स्वप्न पूर्ण करेन; वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल ७५ टक्के संपत्ती दान करणार, ३५ हजार कोटींची नेटवर्थ

SCROLL FOR NEXT