The Solapur Pune Solapur Hutatma Express running from Solapur railway station has been canceled till March 31
The Solapur Pune Solapur Hutatma Express running from Solapur railway station has been canceled till March 31  
सोलापूर

दुहेरीकरणाच्या कामासाठी हुतात्मा एक्सप्रेस 31 मार्चपर्यंत रद्द; भाळवणी-भिगवण सेक्शन दरम्यान होणार काम

विजय थोरात

सोलापूर : रेल्वे प्रशासनाकडून भाळवणी- भिगवन सेक्शनमध्ये नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणारे सोलापूर पुणे सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

सध्या सोलापूर विभागात रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे. एक मार्च रोजी मोठा गाजावाजा करत हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. मात्र दहा दिवसातच या गाडीला 31 मार्च पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असल्याने पुन्हा सोलापूरकरांची निराशा झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूरकरांना पुण्याकडे जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. यामुळे साहजिकच रेल्वेकडून 20 दिवसांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सोलापूर विभागामध्ये भाळवणी ते भिगवण सेक्शन दरम्यान दुहेरीकरणाच्या आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी 12 मार्च ते 31 मार्च दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणारी गाडी क्रमांक 01158 हुतात्मा-पुणे विशेष एक्सप्रेससह तीन गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

दरम्यान गाडी क्रमांक 07613 पनवेल-नांदेड ही गाडी 15 मार्च ते 1 एप्रिल 2019 पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 08519 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस ही गाडी 12 मार्च ते 30 मार्च 2021 पर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तरी रेल्वे प्रवाशांनी रेल्वे गाड्या रद्द झाल्याची खात्री करूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सोलापूर भागात विद्युतीकरण आणि शहरीकरणाच्या कामासाठी 12 मार्चपासून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी हुतात्मा एक्सप्रेससह इतर गाड्या देखील रद्द करण्यात आले आहेत. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT