Solapur Rain Update esakal
सोलापूर

Rain Update : सोलापुरात Non Stop सलग 22 तास धुवांधार; बळीराजा खूश, खरिपाच्या पिकांना मिळणार जीवदान

या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार असून, सोयाबीन व तूर पिकांची पेरणी करणे शक्य होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी मध्यरात्री सुरू झालेली पावसाची रिपरिप मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मंगळवारी दिवसभर भिजपाऊस सुरू होता. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

सोलापूर : जिल्ह्यात (Solapur) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक पावसाचे सोमवारी (ता. १७) मध्यरात्री पासून संततधार पावसाने हजेरी लावली. शहर व परिसरात मंगळवारी (ता. १८) मध्यरात्रीपर्यंत म्हणजे सलग २२ तासांहून अधिक काळ पावसाची रिमझिम सुरू होती.

दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे (Rain Update) मंगळवारी सूर्यदर्शनच झाले नाही. सुमारे १६.२ आहे. मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून एकही सर्वदूर व समाधानकारक पाऊस झाला नव्हता.

सोमवारी मध्यरात्री सुरू झालेली पावसाची रिपरिप मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मंगळवारी दिवसभर भिजपाऊस सुरू होता. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या वेळेत ६.७ मिलिमीटर तर मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार असून, सोयाबीन व तूर पिकांची पेरणी करणे शक्य होणार आहे.

शहरातील रस्ते चिखलमय

सोलापूर शहरात ठिकठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. या सलग पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. काल दिवसभर पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून फिरणेही मुश्कील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT