Penalty esakal
सोलापूर

सोलापूर : पेहे येथील शेतकऱ्यांना तब्बल ३९ कोटींचा दंड

महसूल विभागाच्या नोटीसनंतर येथील शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर: विना परवाना सुमारे ४० हजार ९९३ ब्रास इतक्या दगड आणि मुरुमाचे उत्खनन करुन परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी पेहे (ता. पंढरपूर) येथील २२ शेतकऱ्यांना महसूल विभागाने सुमारे २९ कोटी आठ लाख ७०० रुपये दंड केला आहे. दंडाची रक्कम सात दिवसात भरावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर महसूल विभागाची थकबाकी म्हणून बोजा चढवण्यात येईल, अशा नोटीस देण्यात आल्या आहेत. महसूल विभागाच्या नोटीसनंतर येथील शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बेकायदेशीर दगड आणि मुरुम उत्खननप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी महसूल विभागाकडे तक्रारी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पेहे येथे मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून बेकायदेशीर दगडाचे उत्खनन करुन तो खडीक्रशरसाठी वापरण्यात आला होता. तर मुरुम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आला होता. याप्रकरणी दाखल केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जावून पंचनामे केले होते. त्यावेळी सुमारे ४० हजार ९९३ ब्रास दगड आणि मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर महसूल विभागाने कारवाई करत शेतकऱ्यांना दणका दिला आहे.

दरम्यान, दंड वसुल करावा अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केली आहे. त्यानंतर पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी पाच एप्रिल रोजी पुन्हा संबंधित २२ शेतकऱ्यांना दंडाची रक्कम सात दिवसांच्या आत भरावी, अन्यथा जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. येथील शेतकऱ्यांना दंडाच्या नोटीस मिळाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण सत्ता कुणाची येणार? महायुतीला किती जागा? वाचा...

KDMC Election Result 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता? विजयी उमेदवारांची यादी समोर

Malegaon Municipal Result : मालेगावात भाजपाचा सुपडा साफ; पालिका हातातून गेली, इस्लाम पार्टीचा दणदणीत विजय, शिवसेनेला किती जागा?

Pune Municipal Results : पुण्यात मोठा राजकीय धक्का! प्रभाग 39 मध्ये गुंड बापू नायरचा पराभव, भाजपचा धडाकेबाज विजय

Nashik Election Result: नाशिकमध्ये माजी महापौर विरुद्ध माजी उपमहापौर रंगलेली लढत; अखेर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ?

SCROLL FOR NEXT