रतनकाकी प्रथमच राजकीय व्यासपीठावर
रतनकाकी प्रथमच राजकीय व्यासपीठावर  sakal
सोलापूर

सांगोला : रतनकाकी प्रथमच राजकीय व्यासपीठावर

दत्तात्रय खंडागळे

सांगोला : शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीच्या दोन दिवशी अधिवेशनाच्या बैठकीसाठी शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनकाकी देशमुख प्रथमच राजकीय व्यासपीठावर आल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. रतनकाकीच्या राजकीय व्यासपीठावर येण्याने स्वर्गीय आबासाहेबांच्या वारसाबाबत स्थिरता येईल का? याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच शेकापचे जेष्ठ आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात 'अक्कासाहेब जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल' असे जाहीरही केले.

शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. एकच पक्ष, एकच मतदारसंघ यातच विक्रमी वेळा आमदार झालेले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे पक्षामध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. विधानसभेच्या निवडणूकीनंतर तालुक्यात सध्या स्वर्गीय आबासाहेबांच्या वारसाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्या. आबासाहेबांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाचे राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीचे दोन दिवसीय अधिवेशन सांगोल्यात संपन्न झाले. दोन दिवशीय अधिवेशनासाठी कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रतिसादामुळे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यातच या अधिवेशनावेळी व्यासपीठावर स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनकाकी देशमुख प्रथमच राजकीय व्यासपीठावर आल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर त्यांच्या येण्याने तालुक्यात सुरू असणाऱ्या राजकीय वारसाबाबत सध्यातरी स्थिरता येईल का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभेचा उमेदवार आक्कासाहेब ठरवतील

या अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जमिनीवर राहून कार्यकर्त्यांची सुसंवाद राखून काम करण्याच्या सूचना दिल्या. मला पद मिळाल्याने मी फार कोणीतरी मोठा असे पदाधिकाऱ्यांनी समजू नये. शेकापमध्ये तळागाळातील कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य आहे असेही ठणकावून सांगितले. सध्या आमच्या पक्षीय घरामध्ये विरोधकांनी डोकावू नये असे सांगतानाच अक्कासाहेब (स्व. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी) ह्याच विधानसभेचा उमेदवार ठरवतील असे जाहीर केल्याने सध्यातरी शेतकरी कामगार पक्षात राजकीय वारसाबाबत स्थिरता येईल असे वाटते आहे.

नव्या तालुका चिटणीस निवडीकडे लक्ष

शेकापच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सर्व तालुक्याचे चिटणीस मंडळ बरखास्त केले आहे. नवे चिटणीस मंडळात तरुणांना संधी देईल असेही यावेळी सांगितल्याने सांगोला तालुक्यांमध्ये कोणाला संधी मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT