maramari
maramari sakal
सोलापूर

Solapur : सावळेश्वर येथे दोन गटात राडा,घरा समोर गाड्या लावल्याचे कारण,दुचाकी पेटविल्या.

राजकुमार शहा

मोहोळ : आमच्या घराच्या गेटसमोर निळी चक्र असलेल्या मोटार सायकली का लावल्या या कारणा वरून दुचाकी वर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी एकावर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.ही घटना सावळेश्वर ता मोहोळ येथे रविवार ता 26 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.अजीत बाळासाहेब गावडे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.दरम्यान अजीत गावडे यास पोलीसांनी अटक केली आहे.

या संदर्भात मोहोळ पोलीसा कडुन मिळालेल्या माहिती नुसार,सावळेश्वर येथील दिलीप पांडुरंग जगताप वय 44 यांची मुलगी दिक्षा हिची सोयरीक बिबवेवाडी (पुणे) येथील चंदन अभिमन सोनवणे याच्याशी जमल्याने जगताप यांनी नातेवाईकांच्या संमतीने रविवार ता 26 रोजी सायंकाळी गावातच घरा समोरील बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत मंडप मारुन साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता.

या साखर पुड्याच्या कार्यक्रमा साठी आमचे नातेवाईक व गावातील समाजाचे व प्रतिष्ठीत नागरीक तसेच मुला कडील नातेवाईक मंडळी आल्याने साखरपुड्याचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. कार्यक्रमा साठी आलेल्या नातेवाईकांच्या मोटार सायकली व चार चाकी वाहने त्यांना जागा मिळेल तशी लावली होती. अजित बाळासाहेब गावडे याच्या घराच्या लोखंडी गेट समोरही गाड्या उभ्या केल्या होत्या.

सुमारे साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमासाठी आलेल्या नातेवाईकांचे जेवण सुरु होते.दिलीप जगताप हे आलेल्या नातेवाईकांना भेटुन त्याच्याशी बोलत रोडवर उभे असताना, जगताप यांच्या घरा समोर राहणारा अजित गावडे हा हातात पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन लोखंडी गेटच्या बाहेर आला व गेट समोर लावलेल्या मोटार सायकलवर पेट्रोल टाकुन आग लावली.

आग लावलेल्या गाड्याच्या समोरील बाजुस समाजाचे प्रतीक असलेले निळे अशोक चक्र होते.अचानक गाड्यास आग लावल्याने त्या ठिकाणी मोठी धावपळ सुरु झाली . तेथे जमलेल्या नागरीका पैकी मनोज लक्ष्मण राठोड, संजय रामचंद्र साबळे, साजन रविंद्र जगताप, जितेंद्र विष्णु साबळे, कोंडीबा प्रल्हाद जगताप असे सर्व मिळून जवळ असलेल्या पाण्याचे जार घेवुन त्यातील पाणी गाडीवर टाकुन आग विझवली.

आग विझवताना मारुती सोनवणे यांच्या पायाला भाजले आहे. आग विझवत असताना अजित गावडे यांने जमलेल्या लोकांना उद्देशुन तुम्हाला मस्ती आली आहे का, निळे चक्र असलेल्या गाड्या माझ्या गेट समोर का लावता, असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करुन जगताप यांचा मुलगा सुनिल यास मारहाण करु लागला.

त्यावेळी सर्व जण त्यास सोडवत असताना गावडे हा तेथुन पळत घरात जाताना तो पडल्याने त्यास मार लागला आहे. अजित गावडे याने गाड्यास लावलेल्या आगीमुळे गाड्याचे अंदाजे वीस ते पंचवीस हजाराचे नुकसान झाले आहे. तसेच आगीमुळे निळे अशोक चक्राची सुद्दा नासधूस झाली आहे. या घटने मुळे आलेले नातेवाईक जेवण न करता गेल्याने अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.या सर्व गोष्टीची माहीती असुन सुद्धा गावड़े याने जातीवाचक शिवीगाळ करून जाणीव पुर्वक हे कृत्य केले आहे.

या प्रकरणी दिलीप पांडुरंग जगताप वय 44 यानी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे.मोहोळ पोलीस तपास करीत आहेत.दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणुन सावळेश्वर येथे पोलीसांचा फिक्स पॉईंट लावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT