solapur sakal;
सोलापूर

Solapur School : चिमुकल्यांच्या बाजारात व्यवहारांचे धडे

विद्यार्थ्यांना बाजाराचा अनुभव यावा, पैशाची देवाण घेवाण करता यावी यासाठी सदर बाजाराचे आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

अनगर - सकाळी नऊची वेळ रोज सकाळी प्रार्थना व राष्ट्रगीताचा आवाज ऐकायला यायचा, आज मात्र भाजी घ्या ताजी. . .कोथिंबीर पाच रुपयाला पेंडी...कांदा मुळा स्वस्त दिला, ये घ्या खमंग भेळ, देशी शेवगा घ्या, पेरू घ्या पेरू, डाळिंब व बोरं आली लई मस्त या अशा ललकारीन  स्टोनब्रिज  पब्लिक  स्कूलचा परिसर दणाणून गेला. निमित्त होते,

स्टोनब्रिज पब्लिक स्कूलमध्ये असलेल्या बाजार दिवसाचे. विद्यार्थ्यांना बाजाराचा अनुभव यावा, पैशाची देवाण घेवाण करता यावी यासाठी सदर बाजाराचे आयोजन केले होते.यावेळी बाजाराचे उद्‍घाटन कै. शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगरचे प्राचार्य चंद्रकांत ढोले सर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महादेव चोपडे, ज्ञानेश्वर माने,

दादा नागटिळक, श्रीकांत दांडगे, विशाल कारंडे, सचिन सरक, सत्यवान दाढे, सोमनाथ ढोले, विशाल निरगिडे, संतोष टकले ग्रामस्थ व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. बाजार हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी  स्टोनब्रिजचे प्राचार्य  तुळशीदास ढेरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रेश्मा पवार, शाहीन शेख, सोनाली सोलंकर,

वैशाली गुंड, स्वाती जाधव, विद्या गुंड, गणेश उघडे, बालअन्सर शेख, जनाबाई गायकवाड यांनी परिश्रम घेतले गावकरी, पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सहभागी झाले होते.उपक्रमाचे  माजी आमदार राजन पाटील, लोकनेतेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी सर्वाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ थोडक्यात बचावले, हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक... थेट पार्किंगमध्ये... Video पाहा

Tiger Sighting Sindhudurg : तळकट परिसरात पट्टेरी वाघाचा वावर; 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित नकाशाने वन्यजीव धोक्यात? प्रकल्पाच्या मार्गात नवे आव्हान!

ऑफिसमध्ये महिलांकडे एकटक बघणं गुन्हा आहे की नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

"आम्ही 24 तास काम करतो..." ठरलं तर फेम जुईने उघड केली मालिकेच्या शूटिंगची कसरत "आजारी असतानाही.."

UP Tourism: 'पेशव्यांचा ठसा UP मध्ये! ‘गणेश बाग’ म्हणून ओळखला जाणारा ‘मिनी खजुराहो’ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT