Children Market
Children Market Sakal
सोलापूर

सोलापूरात चिमुकल्यांचा आठवडे बाजार; तब्बल २५ हजारांची उलाढाल

वसंत कांबळे

कुर्डू : विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला व यशवंत प्रायमरी स्कूल अंबाड येथे आनंद नगरी उपक्रमांतर्गत भरवलेल्या बाजारात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान आत्मसात व्हावे यासाठी शाळेच्या आवारात बाजार भरवण्यात आला होता. यामध्ये 25 हजार रुपयांच्या मालाची विक्रीची उलाढाल झाली.

या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या,पालेभाज्या, उसाचा रस, चहा, समोसे, खमंग ढोकळा,मक्याची कणसे, चिंचा, केळी,बोरे, सफरचंद, संत्री, अशाप्रकारे विविध फळे,भाजीपाला व खाद्यपदार्थाची रेलचेल बाजारात होती.

या विद्यार्थ्यांच्या आठवडी बाजाराचे उद्घाटन दूध संस्थेचे चेअरमन व पालक श्री. पितांबर गाडे यांच्या करण्यात आले यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री.जवानसिंग रजपूत , यशवंत प्रायमरी स्कूल चे प्राचार्य श्री.होनमोटे,उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक विष्णू घाडगे हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आणलेल्या विविध वस्तूची खरेदी करण्यासाठी गावातून व आसपासच्या भागातून विविध पालक व नागरिक आलेले होते . तसेच विठ्ठलराव शिंदे उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनीही खरेदी करण्यासाठी सहभाग घेतला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक व व्यावहारिक ज्ञानाबरोबरच ग्राहकाशी सुसंवाद कसा साधावा याचाही प्रत्यक्ष अनुभव आला. यासाठी कला शिक्षिका सौ टोणपे यांनी नियोजन केले होते .त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT