school uniform esakal
सोलापूर

Solapur : गरीब कुटुंबातील चिमुकल्यांच्या नशिबी एकच गणवेश

एकच गणवेश देण्याच्या सरकारच्या हम करेसो कायदा या धोरणामुळे गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील बिचाऱ्या चिमुकल्यांची नशिबी तोच तो एकच गणवेश

सकाळ डिजिटल टीम

Solapur : ‘आरटीई’ कायद्याअंतर्गत गणवेशाचा रंग व कापड निश्चित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीचाच आहे. तरीदेखील तो अधिकार डावलून सरकार राज्य स्तरावर सर्व मुलांसाठी एक गणवेश सारखाच असावा आणि तो आम्हीच देणार असा हट्ट धरला. तो अजूनही न मिळाल्याने ऐन पावसाळ्यात अस्वच्छ गणवेश घालून चिमुकल्यांना शाळेत यावे लागत आहे.

दरम्यान, एकच गणवेश देण्याच्या सरकारच्या हम करेसो कायदा या धोरणामुळे गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील बिचाऱ्या चिमुकल्यांची नशिबी तोच तो एकच गणवेश घालून शाळेत जाणे नशिबी आले आहे. दरवर्षी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलींना व अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शासनाकडून दोन गणवेश मिळतात.

त्यासाठी प्रत्येकी ६०० रुपये शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाला येतात. तेथून प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीला तो निधी वर्ग केला जातो. मात्र, यंदा शासनाकडून केवळ एकाच गणवेशासाठी पैसे प्राप्त झाले.

सध्या पावसाळा सुरु असल्याने चिमुकल्यांचा गणवेश अस्वच्छ होतो. पण, दुसरा गणवेश नसल्याने तोच गणवेश घालून त्यांना शाळेत यावे लागत आहे. तरीसुद्धा शासनाकडून दुसरा गणवेश मिळत नाही, हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT