अक्कलकोट sakal
सोलापूर

Solapur : श्री स्वामी समर्थ मंदिर ते गुरु मंदिर पर्यंत लागली भाविकांची मोठी रांग

अक्कलकोटला नववर्षाचे हर्ष आणि उल्हासात स्वागत

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या अक्कलकोट नगरीमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. काल मावळत्या वर्षाला निरोप देताना आणि आज नववर्षाचे स्वागत करताना भाविकांची झालेली प्रचंड गर्दी हे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. अलीकडील काळात धार्मिक पर्यटनाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी झालेले आहे त्याला अक्कलकोट शहर ही अपवाद ठरलेले नाही.

अक्कलकोटला यावं आणि श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परत जावं या उद्देशाने काल आणि आज हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट शहरात आलेले दिसले. आज भल्या पहाटेपासूनच अक्कलकोट शहरामध्ये भाविकांच्या मोठ्या उपस्थितीने श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर आणि अक्कलकोट शहरातील प्रमुख रस्ते हे गजबजून गेलेले दिसले. आज दुपारपर्यंत अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुरु मंदिरापर्यंत दुहेरी रांग रस्त्यावरच लागलेली दिसले.

देवस्थान समितीने व्यवस्था केलेले मंडप वगळता तिथून मुख्य रस्त्यावर आल्यानंतर गुरु मंदिर पर्यंत भाविकांना उन्हातच उभे राहावे लागल्याचे दिसून आले. लहान मुले अबालवृद्ध आणि महिला या मोठ्या संख्येने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आतुर होऊन उन्हात आपले होत असलेली गैरसोय ध्यानात ठेवून ही उभे राहिलेले दिसले. तिथूनच अर्ध्या रस्त्यावर नेहमीची दोन चाकी आणि तीन चाकी वाहतूक सुरूच होती.

मात्र पोलीस प्रशासन यांनी केलेल्या नियोजनुसार चार चाकी वाहने मात्र या मंदिर परिसरापासून बरेच लांब नेमलेल्या वाहन तळावर लावली गेलेली दिसले.यासाठी पोलीस प्रशासनाने पुरेपूर बंदोबस्त तैनात केल्याचे दिसले. याऊपरही भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, शहरात सर्वत्र स्वच्छ गृहाची व्यवस्था, दर्शन रांगेसाठी उभे केलेले सावली, हवी असलेली आणखी स्वच्छता, औषध फवारणी, पुरेशा वाहनतळा अभावी होत

असलेली गैरसोय आदी बाबींवर यापुढे प्रशासनाला लक्ष देऊन आणखी भाविकांना कोणत्याही प्रकारची त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. श्री स्वामी समर्थ मंदिराचा परिसर अन्नछत्र मंडळाचा परिसर, मैंदर्गी रस्ता श्री शेख नुरुद्दीन बाबा दर्गा परिसर, श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसर, बस स्थानक परिसर आदी ठिकाणी भाविकांसाठी आणखी चांगल्या सोयी उपलब्ध करून त्यांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे. काही असले तरी आहे त्या

सुखसोयीमध्ये समाधान मानत आज दिवसभर हजारो भाविक अक्कलकोटला आलेले आहेत. स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परत जात आहेत. येत्या काळात दर गुरुवारी, पौर्णिमा आणि शनिवार व रविवार सुट्या याशिवाय सलग सुट्ट्यांचे दिवस या कालावधीत नेहमीच सतर्क राहून भाविकांना कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाही हे पाहावे लागणार आहे. नववर्षाचे स्वागत करताना भाविकांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Astronomical Events 2026: नववर्षात ४ सुपरमून, २ ब्लूमून व १२ उल्कावर्षाव; देशवासीयांना विविध खगोलीय घटनांची मिळणार पर्वणी

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT