लस sakal
सोलापूर

लस न घेतलेल्यांची रोगप्रतिकारक शक्‍ती कमीच; सिरोसर्व्हेचा निष्कर्ष

दोन्ही डोस घेतलेले ९७ टक्के व्यक्ती सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील अपार्टमेंट, हौसिंग सोसायट्या, बंग्लोज, झोपडपट्ट्यांमधील एक हजार व्यक्‍तींमधील रक्‍ताचे नमुने सिरोसर्व्हेतून तपासण्यात आले. त्यामध्ये दहा वर्षांवरील व्यक्‍तींमध्ये विशेषत: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ९६.९ टक्‍के व्यक्‍तींमध्ये कोरोनाविरुध्द लढण्याची ताकद आल्याची बाब समोर आली आहे. ५० ते ६९ वयोगटातील तब्बल ९२ टक्‍के व्यक्‍तींमध्येही रोगप्रतिकारक शक्‍ती वाढल्याचे या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. सामूहिक रोगप्रतिकार शक्‍तीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता आता दूर झाली आहे.

शहरातील महापालिकेच्या १५ नागरी आरोग्य केंद्रांअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक परिसरातील ठराविक वयोगटातील व्यक्‍तींच्या रक्‍ताचे नमुने घेण्यात आले. त्यावर मेडिकल कॉलेजमधील सुक्ष्मजीवशास्त्र व जीवरसायनशास्त्र प्रयोगशाळेत त्याची पडताळणी करण्यात आली. कोरोनाविरुध्द लढण्याची ताकद किती लोकांमध्ये आणि कोणत्या वयोगटातील व्यक्‍तींमध्ये आहे, याचा अभ्यास या सर्व्हेतून करण्यात आला. त्यात कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला व दोन्ही डोस घेतलेले, लस न घेतलेले, रक्‍तदाब, मधुमेह असलेले को-मॉर्बिड, दहा वर्षांवरील आणि ५० ते ६९ वर्षांपर्यंतच्या व्यक्‍तींचाही समावेश होता.

३१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत हा सर्व्हे पार पडला. त्यामध्ये लस टोचलेल्यांमध्ये सर्वाधिक तर लस न टोचणाऱ्यांमध्ये कमी प्रमाणात रोगप्रतिकारक शक्‍ती असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरणावर सर्वाधिक जोर दिला जात असल्याने सामूहिक रोगप्रतिकारक शक्‍ती तयार होऊ लागली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट धोकादायक नसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लस टोचल्यानंतरही नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हाताची स्वच्छता या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही सर्वेच्या निष्कर्षातून करण्यात आले आहे.

  • सिरोसर्व्हेचा निष्कर्ष

  • दहा वर्षांवरील ८५.६ टक्‍के मुलांमध्ये आहे कोरोनाविरुध्द लढण्याची शक्‍ती

  • ५० ते ५९ वयोगटातील ९२.२ टक्‍के व्यक्‍ती करू शकतात कोरोनाचा यशस्वी मुकाबला

  • शहरातील ६० ते ६९ वयोगटातील ९१.५ टक्‍के व्यक्‍तींमध्ये कोरोनाविरुध्द लढण्याची ताकद

  • १० ते १९ वयोगटातील ८०.९ टक्‍के तरुणाईमध्ये आहेत कोरोनाविरुध्द लढण्याच्या ॲन्टीबॉडीज

  • प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ९६.९ टक्‍के तर एक डोस घेतलेल्या ९०.९ टक्‍के व्यक्‍तींमध्ये वाढलीय रोगप्रतिकारक शक्‍ती

  • रक्‍तदाब, मधुमेह असलेल्या ९०.३ टक्‍के को-मॉर्बिड रुग्णांमध्येही आढळली रोगप्रतिकारक शक्‍ती

  • कोरोनावरील प्रतिबंधित लस न घेतलेल्या ६९.३ टक्‍के व्यक्‍तींमध्ये रोगप्रतिकारक शक्‍ती कमीच

कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरणातून नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्‍ती वाढली आहे. लस न टोचलेल्यांनी लवकर लस टोचून घ्यावी. लसीकरणामुळे दोन्ही लाटेच्या तुलनेत तिसरी लाट तेवढी धोकादायक नसेल.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, वैश्‍यंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT