solapur village son donate One lakh for development  sakal
सोलापूर

सोलापूर : पिरटाकळी गावच्या सुपुत्राने विकासासाठी दिला एक लाखाचा स्वनिधी

आपल्या गावची ग्रामपंचायत सर्वजण मिळून एकत्र येऊन बिनविरोध करा

इंगोले भागवत

मोहोळ : आपल्या गावची ग्रामपंचायत सर्वजण मिळून एकत्र येऊन बिनविरोध करा, मी आपल्या गावाच्या विकासासाठी एक लाख रुपये स्वनिधी देतो, असा शब्द देणारे पिरटाकळी, ता. मोहोळ येथील रहिवाशी व जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सुतार यांनी आपला दिलेला शब्द पाळुन सुतार परिवारातील सदस्य आणि ज्ञानेश्वर सुतार यांचे सुपुत्र स्वप्निल सुतार यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.मोहोळ तालुक्यातील हा नविन पायंडा अनेकांना स्फुर्ती देणारा आहे.

ज्ञानेश्वर सुतार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिरटाकळी वासियांनी पिरटाकळीची ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. जिल्ह्यात गेली अनेक वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून अनेक प्रेरणादायी ग्रामपंचायतीचा आदर्शवत कारभार केलेल्या ज्ञानेश्वर सुतार यांना आपल्या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मनोमन इच्छा होती. त्यामुळे निवडणूक शांततामय मार्गाने आणि निकोप वातावरणात बिनविरोध व्हावी, या उदात्त हेतूने गावातील या अधिकारी पुत्राने आपल्या गावाला दिलेला एक लाख रुपये स्ववर्गणीचा शब्द पूर्ण करत पिरटाकळी वासीयांचे केवळ मनच जिंकले नाही तर आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासालाही खूप मोठा हातभार लावल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. बिनविरोध ग्रामपंचायती साठीच्या बक्षीस रक्कमेतून ग्रामदेवत येडेश्वरी मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करून विकास कामांना सुरवात झाल्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे.

यावेळी पिरटाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच माऊली पाटील, उपसरपंच हनुमंत खडसुळे, ग्रामपंचायत सदस्य भीमराव थिटे, सारंग थिटे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दत्तू दादा थिटे, संजय निंबाळकर, राष्ट्रवादीचे युवा नेते राजू खराडे, स्वप्नील सुतार, प्रभाकर महामुनी, नवनाथ कदम, जगन्नाथ कदम, बाळू फंड, आबा थिटे, सुयश मोटे, बाळू गवळी, विकास थिटे, श्रीमंत जाधव, इत्यादिं सह ग्रामस्थ उपस्थित होते.

दर पंचवार्षीक निवडणुकां मध्ये अनावश्यक खर्च होतो. शासकीय यंत्रणावर त्याचा ताण पडतो, शिवाय निवडणुकां मधील राजकीय मतभेदांमुळे गावाच्या शांततेला बाधा पोहोचते. त्यामुळे माझ्या गावची निवडणूक ही बिनविरोध व्हावी असा प्रस्ताव मी ग्रामस्थांना समोर मांडला. त्यावेळी सर्वपक्षीय उमेदवारांनी आणि गावातील ज्येष्ठ राजकीय मंडळींनी चर्चा करून सामोपचाराने गतवर्षी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचा निर्णय घेतला.मी दिलेले अश्वासन पुर्ण केले.

- ज्ञानेश्वर सुतार, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT